Advertisement

नगरसेवकांची हजेरीही आता आधारकार्डला जोडून बायोमेट्रिकद्वारे!


नगरसेवकांची हजेरीही आता आधारकार्डला जोडून बायोमेट्रिकद्वारे!
SHARES

मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनं नोंदवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर आता महापालिकेतील नगरसेवकांचीही हजेरी आधारकार्डला जोडून बायोमेट्रिक पद्धतीनं नोंदवली जाणार आहे. एवढंच नव्हे तर महापालिका सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केलेली ही मागणी मान्य करत प्रशासनाच्या वतीनं लवकरच याबाबतचा प्रस्ताव विधी समितीत सादर केला जाणार आहे.


दरवाज्यातच नोंदवणार हजेरी

महापालिका सभागृहाच्या दरवाज्यांवर नगरसेवकांची उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक मशिन्ससह जवळच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे फेब्रुवारी महिन्यात केली होती. त्यानुसार याबाबतचा निर्णय महापालिका चिटणीस कार्यालयाच्या अखत्यारितला आहे. त्यामुळे याबाबत गटनेत्यांच्या सभेत निर्णय घेतला जाणार असून या निर्णयानुसार विधी समितीच्या सभेपुढे प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.


गतिमान सेवा देण्याचा प्रयत्न

महापालिकेच्या मानव संसाधन विभागानं गटनेत्यांच्या सभेपुढे यानुसार निवेदन केलं आहे. मुंबईचं परिवर्तन हे जागतिक दर्जाचं शहर म्हणून करायचं असल्यानं मुंबईतील नागरिकांसाठी असणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करून या शहरातील जीवनाची गुणवत्ता व आकारमान ठरावीक उंचीवर असणं आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत वेगवेगळ्या संगणकीय प्रणाली विकसित करून त्यांची अंमलबजावणी केली जात आहे. यासाठी महापालिकेतील बहुतांश सेवांचं आधुनिकीकरण करून नागरिकांना गतिमान सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


अाधार क्रमांक जोडला जाणार

याचाच भाग म्हणून १५ एप्रिल २०१७ पासून आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रिक हजेरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. १५ जुलै २०१७ पासून हजेरीपट बंद करून आधार कार्ड क्रमांकाशी संलग्नित बायोमेट्रीक हजेरी पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. यासाठी लागणारी बायोमेट्रिक उपकरणे आपल्या स्तरावर खरेदी करण्याचे आदेश प्रत्येक खातेप्रमुख आणि विभाग प्रमुखांना देण्यात आले असल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.


हेही वाचा -

आता बायोमेट्रि‍क पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी!

कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक्सनं, मग नगरसेवकांची कधी?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सला हरवून सलग तिसरा विजय नोंदवणार का? काय वाटते? प्रतिक्रिया नोंदवा.
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा