Advertisement

वाशी पूलाच्या विस्ताराला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

वाशी पुलाच्या विस्तारीकरणाला मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला आहे.

वाशी पूलाच्या विस्ताराला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
SHARES

the vashi pool will be green to expand

वाशी पुलाच्या विस्तारीकरणाला मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वाशी व तुर्भे गावाजवळच्या वाशी पुलाचा (ठाणे खाडीवरील) विस्तार करण्यात येणार आहे. तसंच, दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३ लेन वाढवण्यात येणार असून, सीआरझेड क्षेत्रात बांधकाम करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी मंजूरी दिली.

मोठा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या सकारात्मक निर्णयामुळं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) मोठा दिलासा मिळाला आहे. याव्यतिरिक्त नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासाठी तिवरांची झाडं तोडण्यास तसंच मेट्रो-२ए व ऐरोली पुलाच्या बांधकामासाठी तिवरांची झाडं तोडण्यासही न्यायालयानं परवानगी दिली आहे.

विविध प्राधिकरणांची मंजुरी

तिवरांची वृक्षतोड किंवा सीआरझेड क्षेत्रातील बांधकामासाठी विविध प्राधिकरणांच्या मंजुरी मिळवल्यानंतर उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणं सन २००५मधील निवाड्यानुसार बंधनकारक आहे. त्यानुसार एमएमआरडीए, एमएसआरडीसी व सिडकोनं यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. या याचिकेच्या सुनावणीनंतर न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.



हेही वाचा -

'सीएस' परीक्षेतील २ पेपर ढकलले पुढे, कारण अस्पष्ट

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकात रविवारी गर्डर ब्लॉक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा