Advertisement

मुंबईत ७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ कोटी किंमतीच्या २ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

मुंबईत ७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त
SHARES

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ कोटी किंमतीच्या २ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बुधवारी दहिसर इथं गुन्हे शाखेनं सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं ७ जणांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही लोक २ हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन मुंबईत येणार आहेत, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचं एक पथक दहिसर येथे थडकले. गुन्हे शाखेने दहिसर येथे सापळा रचला. आरोपी येत असलेल्या गाडीला थांबवून त्यांची विचारपूस केली.

तपासामध्ये आरोपींच्या गाडीतून पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. या गाडीत या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या २५ हजार नोटा होत्या. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून इतर आरोपींचीही माहिती मिळाली. हे सर्व हॉटेल अम्फा येथे थांबले होते.

ही माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेनं हॉटेलवर छापा टाकला. येथून पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या दहा हजार बनावट नोटा जप्त केल्या. या नोटांची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे.

या कारवाईत मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी एकूण ७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. शिवाय एकूण सात आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना गुन्हे शाखेनं न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. या नोटा नेमक्या आल्या कुठून? यामध्ये कोण कोण संबंधित आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा