Advertisement

भिवंडी इमारत दुर्घटना : एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

या दुर्घटनेत एका सुरक्षा रक्षकाचा ढिगाराखाली दबून मृत्यू झाला.

भिवंडी इमारत दुर्घटना : एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
SHARES

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथं एका गोदामाचे छत सकाळी कोसळले होते. मनकोलीच्या हरिहर कंपाउंडमध्ये सोमवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, मनकोली नाकाजवळ ही एक मजली इमारत होती. त्याचा गोडाउन म्हणून वापर केला जात होता. या दुर्घटनेत एका सुरक्षा रक्षकाचा ढिगाराखाली दबून मृत्यू झाला.

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक मजली गोडाऊनमध्ये ३१ जण होते. त्याच दरम्यान इमारतीचे छत कोसळले. ३१ जणांपैकी २३ जण कसेबसे सुखरूप बचावले. तर एका सुरक्षा रक्षकाचा त्यात मृत्यू झाला.

मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव सौरभ त्रिपाठी असं होतं. यानंतर ७ जण ढिगाराखाली दाबले गेले होते. त्यांनाही बाहेर काढण्यात आलं. ते सगळेच जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी भिवंडी अग्निशमन केंद्राचे ३ फायर वाहन दाखल झाले आहे. तसंच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षा, ठाणे अग्निशमन केंद्र तसंच ठाणे आपत्ती प्रतिसाथ पथक (TDRF) मदतीसाठी दाखल झाले होते. तसंच NDRF पथकाला मदतीसाठी आदेश देण्यात आले होते.


हेही वाचा

प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाबरियाला २५ कोटी रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी अटक

गतवर्षी मुंबईतील डेंग्यूचं प्रमाण कमी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा