Advertisement

जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक दिवशी ९०हजारांचा खर्च


जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक दिवशी ९०हजारांचा खर्च
SHARES

मुंबईतील सर्वात विस्तीर्ण पसरलेल्या जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसाठी अखेर सहा वर्षांकरिता कंत्राटदाराची निवड करण्यात आली अाहे. या खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून चौपाटीची स्वच्छता केली जाणार अाहे. मात्र त्यासाठी प्रत्येक दिवशी ९० हजार ते सव्वा लाख रुपये खर्च होणार अाहे. चौपाट्यांवर कचऱ्याचे साम्राज्य

भरती असताना लाटांसह समुद्रातील सर्व कचरा किनारपट्टीवर फेकला जातो. परिणामी चौपाट्यांवर अस्वच्छता अाणि घाणीचे साम्राज्या पसरते. या कचऱ्यात प्लास्टिकचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. हा कचरा साफ करण्यासाठी महापालिकेकडून खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात अाली अाहे. यासाठी स्पेक्ट्रॉन इंजिनियर्स कंपनीची निवड करण्यात आली असून २४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.बिच क्लिनिंग मशीनद्वारे स्वच्छता

पहिल्या वर्षी पावसाळा वगळता प्रतिदिन ८९ हजार ४६२ रुपये तर पावसाळ्यात प्रतिदिन ९७ हजार ९३४ रुपये एवढ्या रकमेचे कंत्राट देण्यात येत आहे. पहिल्या वर्षी ३.३६ कोटींचा खर्च होणार आहे. सहाव्या वर्षी हे कंत्राट ४.२१ कोटी रुपयांचे असेल. बिच क्लिनिंग मशिनद्वारे चौपाटीची स्वच्छता राखली जाणार आहे. यामध्ये पावसाळ्यात १२५ मेट्रिक टन आणि पावसाळा वगळता २० मेट्रिक टन एवढा कचरा दरदिवशी निर्माण होणार असल्याचे कंत्राटात म्हटले आहे. 


जुहू चौपाटीची लांबी६ कि.मी.
जुहू चौपाटीची रुंदी ६० मीटर
वापरण्यात येणारे मशिन ३ बिच क्लिनिंग मशिन

हेही वाचा -

होऊन जाऊदे, ठंडा ठंडा कुल कुल!

Read this story in हिंदी
संबंधित विषय