फ्री पार्किंगवर कंत्राटदाराचा डल्ला

 Vidhan Bhavan
फ्री पार्किंगवर कंत्राटदाराचा डल्ला

नरिमन पॉईंट - दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या 39 वाहनतळावर फ्री पार्किंग सुविधा पालिकेच्या ए विभागाने केल्या होत्या. मात्र फ्री पार्किंग असून सुद्धा अनधिकृत कंत्राटदारांकडून चारचाकी गाड्यांच्या मालकाकडून सर्रास लूट केली जाते.

नरिमन पॉईंट येथील वी. वी. राव मार्गावरील रस्त्याच्या दुर्तफा वाहनतळावर पार्किंगसाठी व्यवस्थापनच्या कंत्राटदाराकडून सर्रास पार्किंगसाठी पैसे मागितले जातात. एका तासासाठी 30 रुपये तर संपूर्ण दिवसांसाठी 90 रुपये पार्किंग शुल्क एका चारचाकी गाडीमागे आकारले जातात. कंत्राट मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे काही निवडक कंत्राटदारांचीच सुरू असलेली मक्तेदारी मोडून काढण्याचे संकेत पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या 39 ठिकाणी असलेल्या वाहनतळावर ए विभागाने फ्री पार्किंगचा निर्णय घेतला होता. त्यासाठी वाहनतळांच्या व्यवस्थापनासाठी पालिकेकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे तेथे फ्री पार्किंग झोन करण्याचा निर्णय महापालिकेच्या ए विभागाने घेतला. महापालिकेच्या ए विभागाने या फ्री पार्किंगच्या वाहनतळावर फ्री पार्किंगचे फलक लावले होते. कंत्राटदारांनी ते फलकही काढून टाकले आणि फ्री पार्किंग असतानाही तेथे बेकायदा कंत्राटदार वाहनचालकांची लुटमार करत आहे.

पोलीस ठाण्यात सदर कंत्राटदाराविरोधात वाहनचालकांनी तक्रार दाखल करावी. फ्री पार्किंगवर पैसे आकारणे हा गुन्हा असल्याचं ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

या ठिकाणी होणार होती फ्री पार्किंग

39 वाहनतळ गेटवे ऑफ इंडियाजवळील पी. जे. रामचंदानी मार्ग,

विधानभवन मार्ग, जमशेदजी टाटा मार्ग, विद्यापीठ मार्ग, हॉर्निमन सर्कल, जहांगीर आर्ट गॅलरी, एनसीपीए, मरीन ड्राईव्ह यांसारख्या ठिकाणी आहेत

Loading Comments