Advertisement

कडक निर्बंधांच्या नावाखाली 'अघोषित लॉकडाऊन'?

मंगळवारी सकाळी पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यास सांगितल्यानं राज्यभरातील सर्व व्यापारी वर्गामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

कडक निर्बंधांच्या नावाखाली 'अघोषित लॉकडाऊन'?
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढता प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर करत 'मिनी लॉकडाऊन'ची (lockdown) घोषणा केली. रविवारी ही नवी नियमावली जारी केली. या नियमावलीनुसार केवळ विकेंडला म्हणजचे शुक्रवार संध्याकाळी ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकाडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी सकाळी पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद ठेवण्यास सांगितल्यानं राज्यभरातील (maharashtra) सर्व व्यापारी वर्गामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

राज्यात ३० एप्रिलपर्यंत प्रत्येक वीकेंडला २ दिवस कडकडीत लॉकडाऊन आणि अन्य दिवशी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, हे निर्बंध लॉकडाऊन सारखेच असून राज्य सरकारनं जे निर्बंध लादले आहेत, तो एकप्रकारे महिनाभराचा अघोषित लॉकडाऊन आहे. त्यामुळं यावर संतप्त व्यापारी वर्गानं आपेक्ष नोंदवला आहे. या निर्बंधांमुळं जनमानसात अस्वस्थता वाढत चालली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारपासून सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यात मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर नाशिक अशा अनेक ठिकाणी पालिका व पोलिसांकडून दुपारी 2 नंतर दुकाने बंद केली गेली.त्यामुळे राज्यभर सकाळी जमावबंदी आहे की संपूर्ण लॉकडाऊन आहे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं केवळ विकेंडलाच बंद राहणार असल्याचं राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमवालीत स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतू, पूर्व सूचना न देताचं पोलिसांनी (police) सर्व दुकानं बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळं हा एक प्रकारचा लॉकडाऊच आहे, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, ३० एप्रिलपर्यंत आठवडाभर दुकानं बंद राहणार असल्यानं व्यपारी वर्गाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं  पुन्हा एकदा नव्यानं नियमावली जारी करण्याची मागणी व्यापारी वर्ग व राजकिय नेत्यांकडून केली जात आहे.



हेही वाचा -

गोरेगाव, वांद्रे आणि चेंबूरमध्ये ७ दिवसात सापडले सर्वाधिक कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात ८१ लाखापेक्षा अधिकांना कोरोना लसीचा पहिला डोस, केंद्राकडून कौतुक


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा