Advertisement

मराठी पाट्यांच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध का?

राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी घेतला.

मराठी पाट्यांच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध का?
SHARES

राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी घेतला. राज्य सरकारच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. मात्र, व्यापारी संघटनानं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा म्हणाले की, "दुकानांच्या फलकावर मराठी शब्द लिहिण्यास हरकत नाही. मात्र, दुकानाच्या फलकावर मराठी नाव लावताना फॉन्टचा आकार अधिक असावा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात दुकानांच्या फलकांवर मराठी शब्द असावेत, असं म्हटलं होतं. दुकानांमध्ये मराठी नावे लिहिण्यास आमचा विरोध नाही. परंतु मराठी नावे देताना फॉन्ट्सबाबत निर्णय घेतला जात आहे".

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकानं व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017' हा अधिनियम लागू होत असल्यानं दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचं आढळून आले.

अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

राज्य सरकारच्या आदेशात अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ज्या दुकानात कामगार संख्या किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांना देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक लावणे बंधनकारक करण्यात आलंय.


हेही वाचा

मराठीत पाट्या, 'श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे...'; राज ठाकरेंचा इतर पक्षांना टोला

दुकानांच्या पाट्या मराठीतच, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा