Advertisement

वडाळ्यातील विठ्ठल मंदिर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

आषाढी एकादशीनिमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिरात यात्रेचं आयोजन केलं जातं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी करतात. त्यामुळं या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

वडाळ्यातील विठ्ठल मंदिर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल
SHARES

आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी वडाळा येथील श्री विठ्ठल मंदिरात यात्रेचं आयोजन केलं जातं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मंदिरात आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी करतात. यंदाही यात्रेच आयोजन करण्यात आलं असून, या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. यात्रेनिमित्त ११ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत तात्पुरत्या कालावधीकरिता वाहतूक निर्बंध घालण्यात आले आहेत.

हे मार्ग वाहतूकीसाठी बंद

दादर टीटी जंक्शन ते कात्रक रोड जंक्शनपर्यंतचा रोड वाहतुकीस बंद करण्यात आले आहे. टिळक ब्रिजवरून येणारी वाहतूक खोदादाद/दादर टी. टी. सर्कलपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर उत्तर वाहिनीनं रुईया जंक्शनमार्गे वळविण्यात आली आहे. कात्रक रोड हा डेव्हिड बैरेटो सर्कलपासून जी.डी. आंबेकर मार्ग व टिळकरोड जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंद केला आहे. तसंच, जी.डी. आंबेकर रोड हा वाहतुकीसाठी बंद  आहे. सहकारनगर गल्लीपासून टिळक रोड विस्तारित हा (पूर्वेकडून पश्चिमेकडं) वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात आला आहे. लेडी जहाँगीर रोड जंक्शनपासून ते कात्रक रोड जंक्शनपर्यंत पारशी कॉलनी नं. १३ व रोड नं. १४ हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मंचेरजी जोशी मार्ग जंक्शनपासून ते दिनशाँ मार्ग हा देखील वाहतुकीसाठी बंद आहे.

गिरणी कामगारांची दिंडी

गिरणी कामगार शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता दिंडी काढणार आहेत. गिरणी कामगार रखडलेल्या गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर सरकारला सुबुद्धी द्याया मागणीसाठी पांडुरंगाला साकडे घालणार आहेत. गिरणी कामगार ही दिंडी ना. . जोशी मार्गावरील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावरून वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरापर्यंत काढणार आहेत.हेही वाचा -

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी होणार जाहीर

'पावती घ्या, मगच पैसे द्या', मध्य रेल्वेचं प्रवाशांना आवाहनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा