Advertisement

विद्याविहार स्टेशनजवळ ट्रक पलटी

विद्याविहार रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. या ट्रकमधून रेल्वेचं साहित्य ने आण केली जात असल्याचं कळतं.

विद्याविहार स्टेशनजवळ ट्रक पलटी
SHARES

विद्याविहार रेल्वे स्टेशनजवळ ट्रक पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात ५ ते ६ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं समजतं


'असा' झाला अपघात

विद्या विहार रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. या ट्रकमधून रेल्वेचं साहित्य ने आण केली जात असल्याचं कळतं.

ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात सामान ठेवल्यामुळे चालकाचं ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने ट्रक रेल्वे प्रशासनाच्या इमारतीच्या दिशेने कलंडला. त्यावेळी ट्रकमध्ये चालकासह चार जण होते. या अपघातात सर्व जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.


अग्निशमन दल घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.


हेही वाचा -

फटका टोळीने घेतला प्रवाशाचा बळी; कळवा स्थानकातील घटना

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा