Advertisement

औरंगाबादमधील संतप्त शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र

अधिकाऱ्यांनी गावावर बहिष्कार टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

औरंगाबादमधील संतप्त शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना रक्तानं लिहलं पत्र
SHARES

औरंगाबादमधील संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रक्ताने लिहिलेले पत्र पाठवून मदतीची मागणी केली आहे. एबीपीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी या संसर्गजन्य आजार आढळून येत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात 50 जनावरांचा या संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे. त्यातील 16 जनावरे एकट्या रोषणगावातील असल्याचा दावा कृष्णा खरात यांनी ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या रक्ताच्या पत्राद्वारे केला आहे.

तर रोषणगावात गावात एकूण 749 जनावरे आहेत. सध्या 201 जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत, तर सोळा जनावरे दगावली आहेत.

गावातील परिस्थितीबाबत अनेकदा गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सांगितले, मात्र ते महिनाभर गावात आलेच नाही. याबाबत त्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे गावकऱ्यांनी तक्रार केली असता, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी संघटनांनी गावावर बहिष्कार टाकला.

त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहलेल्या पत्रात केला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचं गावकऱ्यांनी म्हटले आहे.



हेही वाचा

मुंबईची मेट्रो लाईन 2A आणि 7 वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता

मराठी फलक नसल्याने मुंबईत ५२२ दुकानदारांना नोटीस, लवकरच...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा