Advertisement

पालघरमध्ये सापडला २ तोंडाचा शार्क मासा

शार्क मासा तो ही दोन तोंडाचा? ऐकल्यावर विचित्र वाटत असेल. पण हे खरं आहे. पालघरमध्ये चक्क दोन तोंडाचा साप सापडला आहे.

पालघरमध्ये सापडला २ तोंडाचा शार्क मासा
SHARES

दोन तोंडाचा साप सापडला असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. काहिंनी तर तो पाहिला देखील असेल. पण तुम्ही कधी ऐकलंय का, दोन तोंडाचा शार्क मासा सापडला. शार्क मासा तो ही दोन तोंडाचा? ऐकल्यावर विचित्र वाटत असेल. पण हे खरं आहे. पालघरमध्ये चक्क दोन तोंडाचा मासा सापडला आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सतपती गावात मासेमारी करणाऱ्यांना दोन तोंडाचा शार्क मासा सापडला आहे. या माशाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मस्त्य विभागानं या माशाला पकडणाऱ्या मच्छीमारासी संपर्क केला.

मिळालेल्या माहितीनुसार, सतपती गावात राहणाऱ्या नितिन पाटिल यांनी या दोन तोंडाच्या शार्क माशाला पकडलं. मागच्या गुरुवारी ते रोजप्रमाणे समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांच्या जाळ्यात दोन तोंडाची बेबी शार्क अडकली. या शार्कची लांबी ६ इंच होती.

नितिन यांनी सांगितलं की, मासा पकडल्यानंतर समजलं की, हा दुर्मिळ मासा आहे. त्यामुळे आम्ही त्याला परत समुद्रात सोडलं. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इंस्टीट्यूटच्या संशोधकांनी सांगितलं की, दोन तोंडाची शार्क मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी अशाप्रकारची शार्क कधीच सापडली नाही. काही वर्षांपूर्वी मॅक्सिकोच्या संशोधकांनी दोन तोंडाच्या शार्कचा शोध लावला होता.हेही वाचा

तेजस ठाकरे यांनी लावला चौथ्या नवीन प्रजातीच्या माश्याचा शोध

नॅशनल पार्क मॉर्निंग वॉकसाठी खुले

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा