SHARE

डोंबिवलीच्या नांदिवली परिसरातील नाल्यात २ तरूण वाहून गेल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. वाहून गेलेल्या तरूणांचा अद्याप शोध न लागल्याने अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर या तरूणांचा शोध घेत आहेत. यापैकी एकाचं नाव हर्षल जिमकल असं असून दुसऱ्याचं नाव कळू शकलेलं नाही.


मित्राला वाचवण्यासाठी...

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळं नांदिवलीतील नाल्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. त्यावेळी हर्षल नाल्यात बुडत असल्याचं त्याच्या मित्रानं पाहिलं. मित्राला वाचवण्यासाठी त्यानेही नाल्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं दोघेही वाहून गेले. या दोघांना शोधण्यासाठी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवण्यात आलं. परंतु अजूनही दोघांचा तपास लागू शकलेला नाही.

मुंबईसह राज्यभरात सोमवारी सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचेही प्रचंड हाल झाले. परिसरातील नद्या आणि नाल्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं काही गावांचा संपर्क देखील तुटला होता.हेही वाचा-

पाण्यातून मार्ग काढत विरारहून चर्चगेट लोकल रवाना...

३ महिन्याचं बाळ पळवणारी महिला गजाआडसंबंधित विषय
ताज्या बातम्या