Advertisement

...म्हणून विनावर्दी कारवाई नको, मुंबई पोलिस आयुक्तांचे आदेश

विनावर्दी लोकांवर कुठलीही कारवाई करू नका, असं पोलीस आयुक्तांनी बजावलं आहे.

...म्हणून विनावर्दी कारवाई नको, मुंबई पोलिस आयुक्तांचे आदेश
SHARES

कुठलीही कारवाई करताना पोलिस कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वर्दीत राहणं बंधनकारक असेल. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी तशा सूचना दिल्या आहेत. विनावर्दी लोकांवर कुठलीही कारवाई करू नका, असं पोलीस आयुक्तांनी बजावलं आहे.

इतकंच नाही तर हा निर्णय वाहतूक पोलिसांनाही लागू असेल. वाहतूक पोलिसांनाही विना वर्दी आता गाड्या अडवता येणार नाही.

काही ठिकाणी पोलीस साध्या वेशात कारवाई करताना आढळत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी या सूचना दिल्या. विनावर्दी कारवाई करतानाचा फायदा तोतया अधिकारी घेऊ शकतात. त्यामुळे वर्दीत राहूनच जी काही असेल ती कारवाई करा, अशा सूचना हेमंत नगराळे यांनी दिल्या.


हेही वाचा : आॅक्सिजनवरील कोविड रुग्णसंख्या ३० हजारांवर गेल्यास पुन्हा कडक निर्बंध!


हेमंत नगराळे यांची मार्च २०२१ मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी पोलीस दलाबाबत विविध निर्णय घेतले. परमबीर सिंगांच्या (Param Bir Singh) जागी नियुक्त झालेल्या हेमंत नगराळेंनी आपला पहिला निर्णय विशेष पथकाच्या पुनर्रचनेचा घेतला होता. यापुढे मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंद नगराळे (Hemant Nagrale) यांनी हा निर्णय घेतला होता.

मुंबई पोलीस दलात पाच विभाग

  • कायदा आणि सुव्यवस्था
  • क्राईम
  • आर्थिक गुन्हे शाखा
  • प्रशासन
  • ट्राफिक

यापैकी कायदा आणि सुव्यवस्था, क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखा या तीन विभागात तपासाच्या अनुषंगानं वेगवेगळी पथक, सेल निर्माण केली जात असतात. मात्र आता असा प्रकार होणार नाहीत. कोणतंही विशेष पथक सुरू न ठेवण्याचा किंवा न बनवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतला आहे.



हेही वाचा

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर सापडल्या पेट्रोलच्या बाटल्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा