Advertisement

टेक्सटाईल म्युझियम...तलावातलं पाणी जागवणार गिरण्यांचा इतिहास!

पहिल्या टप्प्यातील काही कामांना मंजुरी दिल्यानंतर उर्वरीत तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कामही आता लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये तलावामध्ये कारंजी स्वरुपात पाण्याचा पडदा तयार करून त्यावर गिरण्यांचा इतिहास प्रकाश आणि संगीताच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे.

टेक्सटाईल म्युझियम...तलावातलं पाणी जागवणार गिरण्यांचा इतिहास!
SHARES

काळाचौकीतील बहुचर्चित टेक्सटाईल म्युझियम अर्थात वस्त्रोद्योग संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्राच्या पहिल्या टप्प्यातील काही कामांना मंजुरी दिल्यानंतर उर्वरीत तलावाच्या पुनरुज्जीवनाचे कामही आता लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये तलावामध्ये कारंजी स्वरुपात पाण्याचा पडदा तयार करून त्यावर गिरण्यांचा इतिहास प्रकाश आणि संगीताच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे.


एनटीसीने घेतला पुढाकार

काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल २ व ३ च्या जागेत राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळ (एनटीसी) यांच्या पुढाकाराने मुंबईतील कापड गिरण्यांचा इतिहास वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे.


तीन टप्प्यांमध्ये होणार काम

वस्तूसंग्रहालयाचे काम तीन टप्प्यांत हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील लँडस्केपिंगसह अन्य कामाला यापूर्वीच स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यातील उर्वरीत कामांपैकी तलावांच्या पुनरूज्जीवनासह प्रकाश व संगीत योजना राबवण्याच्या कामांसाठी निविदा मागवण्यात येत आहेत. उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासाठी निविदा मागवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.


२५ कोटींच्या खर्चाचा अंदाज

तलावांमधील पाण्याचा पडदा म्हणून वापर करून त्यावर गिरण्यांचा इतिहास, चाळ संस्कृती, गिरण्यांची तसेच कामगारांची आणि मुंबईची जडणघडण या सर्वांची माहिती प्रकाश व संगीत योजनेच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


जुन्या वास्तूंचीही होणार डागडुजी

टप्पा दोनमध्ये या गिरण्यांच्या जागांमध्ये असलेली जी जुनी बांधकामे आहेत, त्यांची डागडुजी करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. या वास्तूंची डागडुजी झाल्यानंतर अंतर्गत सजावटीचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये भूमिगत वाहनतळांचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये पोडियम आणि उद्यान आदींचे काम केले जाणार आहे.



हेही वाचा

डोंबिवलीचे 'सह्याजीराव' ९००० सह्यांचे धनी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा