Advertisement

टेक्सटाईल्स म्युझियममध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना नोकऱ्या

महापालिकेने टेक्सटाईल म्युझियमच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये गिरणी कामगारांची मुले आणि त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्याचा ठराव करत हा प्रस्ताव संमत केला आहे.

टेक्सटाईल्स म्युझियममध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना नोकऱ्या
SHARES

काळाचौकीतील बहुचर्चित टेक्सटाईल म्युझियम अर्थात वस्त्रोद्योग संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्रच्या पहिल्या टप्प्यातील कामाला शनिवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. परंतु ही मंजुरी देताना या टेक्सटाईल म्युझियमच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये गिरणी कामगारांची मुले आणि त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्याचा ठराव करत हा प्रस्ताव संमत केला आहे.


कुठे उभं राहणार म्युझिअम?

मुंबईची ओळख असलेल्या कापड गिरण्या बंद होऊन त्या जागांवर व्यावसायिक व निवासी इमारती उभ्या रहात आहेत. मुंबईतील कापड गिरण्यांचा इतिहास सर्वांना माहित व्हावा यासाठी राज्य शासन, मुंबई महापालिका आणि राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या पुढाकाराने काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल इथं वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्र निर्माण करणार आहे.

यासाठी पहिल्या टप्प्यात मिलच्या जागेतील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या एकूण जागेपैकी ७ हजार चौरस मीटरच्या जागेवर मूर्त्या आणि ध्वनी, प्रकाश व्यवस्थेमार्फत चित्रीकरणातून प्रदर्शन करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला होता.


मुलांना नोकऱ्या

हा प्रस्ताव मंजुरीला आला असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी टेक्सटाईल्स म्युझियमच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगारात गिरणी कामगारांच्या मुलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्राधान्याने सामावून घेतलं जावं, अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. गिरणी कामगारांनी आपला घाम ज्याठिकाणी गाळला आहे, त्या गिरण्यांचा इतिहास पुन्हा या म्युझियमच्या माध्यमातून उलगडून दाखवताना त्याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुलांना सेवेत घेतल्यास खऱ्या अर्थाने सार्थक होईल, असं त्यांनी सांगितलं.

त्याला सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे उपसूचनेसह मूळ प्रस्तावाला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला. उपसूचनेसह हा प्रस्ताव संमत झाल्यामुळे गिरणी कामगारांच्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न या म्युझियमची उभारणी झाल्यानंतर मिटणार आहे.



हेही वाचा-

महापालिकाच करणार वांद्रे टाऊन मंडईचा पुनर्विकास



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा