कंत्राटदारानं लावला महापालिकेला चुना

 Chembur
कंत्राटदारानं लावला महापालिकेला चुना
कंत्राटदारानं लावला महापालिकेला चुना
कंत्राटदारानं लावला महापालिकेला चुना
See all

चेंबूर वाशी नाका - नवीन भिंत बांधण्याचं कंत्राट घेऊन एका कंत्राटदारानं पालिकेलाच लाखोंचा चुना लावला आहे. वाशी नाका येथील एमएमआरडीए वसाहत परिसरात हे उद्यान असून दोन महिन्यांपूर्वी या भिंती बांधण्यात आल्या. मात्र, जुन्या भिंती न तोडताच त्यावरच या कंत्राटदारानं नवीन बांधकाम केलं आहे. याबाबत शिवसेनेच्या महिला शाखा संघटक स्वाती दाबडे यांनी महापालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र पालिकेकडून कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरच या घोटाळेबाज कंत्राटदारांविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती दाबडे यांनी दिली आहे.

Loading Comments