वरळीत वन महोत्सव साजरा

Worli
वरळीत वन महोत्सव साजरा
वरळीत वन महोत्सव साजरा
वरळीत वन महोत्सव साजरा
वरळीत वन महोत्सव साजरा
वरळीत वन महोत्सव साजरा
See all
मुंबई  -  

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेडने दरवर्षीप्रमाणे यंदाही 'वन महोत्सव' हा कार्यक्रम राबवला. वनमहोत्सव 2017 या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सकाळी वरळी पोलिस कॅम्पच्या सर पोचखानवाला रोड येथील आद्य शंकराचार्य उद्यान येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.


पुढच्या 5 वर्षांत 50 कोटी झाडे लावणार - मुख्यमंत्री

या उपक्रमाला 10 वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. महाराष्ट्राला नवीन ग्रीन कव्हर देण्यासाठी वन मंत्र्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत पुढच्या 5 वर्षात 50 कोटी झाडे लावणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या महाराष्ट्रात 21 टक्के झाडे आहेत. ती 5 वर्षात 33 टक्के करण्याची योजना आहे. 


खरे सुख पर्यावरण देते - मुनगंटीवार

महिंद्रा ग्रुपने 1 कोटी 30 लाख झाडे लावली, हे कौतुकास्पद आहे. 'धन भौतिक सुख देते, पण वन पर्यावरण हेच खरे सुख देते. महाराष्ट्राच्या ग्रीन हरियालीसाठी महिंद्रा ग्रुप सहकार्य करते ही खूप मोठी बाब आह. सी. एस. आरमधून महिंद्रा दरवर्षी वृक्षारोपण करते. नमामी चंद्रभागा या उपक्रमांतर्गत सरकार वृक्षारोपण करते. या उपक्रमात त्या विभागातील जनतेला फळ झाडे देतो. त्याप्रमाणे महिंद्राने पुढच्या वर्षी वृक्ष देऊन मदत करावी अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रुद्राक्षचे झाड तर, मुनगंटीवार यांनी नारळाचे झाड वरळीच्या आद्य शंकराचार्य उद्यानात लावले.

'महिंद्राने 10 वर्षात 130 लाख झाडे लावली'

महिंद्रा अॅण्ड महिंद्राने 2 ऑक्टोबर 2007 रोजी या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत गेल्या 10 वर्षात 130 लाख झाडे लावली. त्यापैकी 75 टक्के झाडे अजूनही जिवंत आहेत, असे सी. एस. आर. काऊन्सिलचे अध्यक्ष राजीव दुबे म्हणाले. ज्या प्रमाणे व्यवसाय वाढवण्यासाठी योजना कराव्या लागतात त्याच प्रमाणे वृक्षारोपण करुन झाडे वाढवण्यासाठी देखील विशेष योजना कराव्या लागतात. आमच्या बरोबरच देशाचा आणि पर्यावरणाचा कसा फायदा होईल, यावर लक्ष केंद्रीत केल्यामुळेच हा वृक्षारोपण उपक्रम राबवू शकलो, असे मत महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केले.




हे देखील वाचा - 

दादरमध्ये पोलिसांनी केली वृक्षारोपण सप्ताहाला सुरुवात!

'एमएमआरडीए'चा वृक्ष रोपणाचा फार्स?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.