Advertisement

'एमएमआरडीए'चा वृक्ष रोपणाचा फार्स?


'एमएमआरडीए'चा वृक्ष रोपणाचा फार्स?
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)ने सोमवारी आरेमध्ये 200 झाडे लावली. 'एमएमआरडीए'चे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांच्याहस्ते आरेतील विविध भागात 200 झाडे लावल्याची माहिती 'एमएमआरडीए'ने दिली आहे. एकीकडे मेट्रोच्या कामासाठी मुंबईतीलझाडांची बेसुमार कत्तल करायची, आरेतील जंगल नष्ट करण्याचा घाट घालायचा आणि पुन्हा 200 झाडे लावण्याचे नाटक करायचे हा प्रकार म्हणजे पर्यावरणाविषयी 'एमएमआरडीए'चे बेगडी प्रेम असल्याची टीका पर्यावरण तज्ज्ञांनी केली आहे.



मेट्रो-7 आणि इतर मेट्रो प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणाचे संतुलन राखत कसा विकास साधता येईल, हाच 'एमएमआरडीए'चा प्रयत्न असणार आहे. त्याचाच भाग म्हणून शक्य तितक्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'ने घेतल्याचे सांगत दराडे यांनी शुक्रवारी आरेमध्ये 200 झाडे लावल्याचे सांगितले आहे. यापुढेही अशाच प्रकारे झाडांची लागवड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

तर, वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी 'एमएमआरडीए'च्या या वृक्ष रोपणाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. 'एमएमआरडीए' असो वा 'एमएमआरसी', हे दोन्ही प्राधिकरण झाडांच्या रोपणाचा केवळ दिखाऊपणा करत आहे. त्यांनी लावलेली झाडे जगत नाहीत, कारण त्यांच्याकडे लक्षच दिले जात नाही. त्यामुळे हा दिखाऊपणा असून जनतेची दिशाभूल करणारे प्रकार थांबवले तर बरे होईल, अशा शब्दात स्टॅलिन यांनी 'एमएमआरडीए'च्या वृक्ष रोपणावर टीका केली आहे.



हे देखील वाचा -मेट्रो 3 : आणखी 35 झाडांचा बळी?

‘एल अँड टी’साठी महापालिका आयुक्तांची वकिली!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा