Advertisement

शनिवारपासून एपीएमसी मार्केट बंद

वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील मसाला मार्केटच्या एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे.

शनिवारपासून एपीएमसी मार्केट बंद
SHARES

वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील मसाला मार्केटच्या एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाने घेतला आहे. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्या मागणी नंतर भाजी, फळ, कांदा बटाटा मार्केट शनिवार 11 एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत.

जीवनावश्यक गोष्टींची कमतरता मुंबईला पडू नये यासाठी एपीएमसी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापारी आणि माथाडी कामगारांनी घेतला होता. मात्र, मसाला मार्केटचा व्यापारी कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यामुळे माथाडी कामगार आणि व्यापारी यांनी मार्केट बंद करण्याची मागणी केली होती.

दुसरीकडे दाना मार्केटच्या माध्यमातून मुंबईत 2.5 लाख टन अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आल्याने पुढील एक महिना पुरेल येवढा साठी शिल्लक आहे. त्यामुळे राज्यभरातून आणि परराज्यातून आलेले अन्नधान्य मुंबई, उपनगर, नवी मुंबईत पोहचविल्यानंतर दाना मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. रविवारी याबाबत माथाडी कामगार, व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी प्रशासन बैठक घेणार आहे. त्यानंतरच निर्णय होणार आहे. मोठ्या प्रमाणात धान्य पुरवठा एपीएमसी मधून मुंबईत करण्यात आल्याने बाजार पुढील काही दिवस बंद राहिला तरी लोकांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मोठ्या शहरात गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय सरकार करत आहे. भाजी खरेदीसाठी मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या गर्दीबाबत लराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लॉकडाऊन असूनही लोक शहरात अजूनही भाजी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये जातात. प्रशासनाने वारंवार सांगूनही गर्दी कमी होत नसल्याने सरकार मोठ्या शहरात भाजी मार्केट बंद करण्याच्या विचारात आहे.


हेही वाचा -

१ ते १० वर्षे वयोगटातील २१ मुलांना करोनाची लागण

Coronavirus Updates: दादरमध्ये कोरोनाचे आणखी ३ नवे रुग्ण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा