Advertisement

मुंबईत भाजीपाल्याचे दर वाढले, आवक झाली कमी

राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळं मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत.

मुंबईत भाजीपाल्याचे दर वाढले, आवक झाली कमी
SHARES

राज्यभर (maharashtra) सुरू असलेल्या पावसामुळं (mumbai rains) मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबी १२० ते १४० रुपये किलो दराने विकली जात असून, शेवगा, दोडका, घेवड्याचे दरही शंभरीच्या पुढे गेले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून आवक कमी होत आहे. प्रतिदिन ४०० ते ४५० वाहनांची आवक होत आहे. यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत.

मागील आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ३५ ते ५५ रुपये दराने विकला जाणारा आवळा ५० ते ५५ रुपये किलोवर गेला असून, किरकोळ मार्केटमध्ये ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. फरसबीचे दर ८० ते १०० वरून १०० ते १२० वर पोहचले आहेत. मुंबईत पुणे, सातारा, दक्षिणेकडील राज्य, नाशिक व इतर ठिकाणावरून भाजीपाल्याची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत. 

भाजीपाल्याचे दर

वस्तू
१० जून (एपीएमसी)
१७ जून (एपीएमसी)
१७ जून (किरकोळ)

भेंडी

१५ ते ४०
२२ ते ५०
५० ते ६०

फरसबी

८० ते १००
१०० ते १२०
१२० ते १४०

फ्लॉवर

१४ ते १६
१४ ते २२
५० ते ६०

घेवडा

३५ ते ४०
४५ ते ५५
१०० ते १२०

शेवगा शेंग

४० ते ५०
६० ते ७०
८० ते १००

दोडका

३६ ते ४०
 ५० ते ६०
१००

वांगी

२४ ते ३०
३० ते ५०
७० ते ८०हेही वाचा -

पुढच्या २ ते ४ आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येणार?; टास्क फोर्सची महत्वाची माहिती

मुंबईसाठी पुढील काही तास धोक्याचे; मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यूRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा