अण्णा हजारे, अखिलेश यादव पोस्ट ऑफिसचे कर्मचारी?

कांदिवली - मुंबईच्या पश्चिम उपनगरातील 12 पोस्ट ऑफिसमध्ये घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. पोस्ट ऑफिसने कर्मचाऱ्यांची नावं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, त्यांचे काका रामगोपाल यादव, भाजपा नेते राम कदम, दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर पाटील, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार असल्याचं सांगितलंय. तसंच त्यांना 7 हजार रुपये वेतनही दिले जात होते. इतकेच नाही तर यामध्ये घोटाळ्याचा विरोध करणाऱ्या किसन बापूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचंही नाव वापरण्यात आलं आहे. हे कर्मचारी मुंबईच्या गोरेगाव आणि पश्चिम उपनगरातील इतर पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. खरतंर बनावट कागदपत्र तयार करून या व्यक्तींच्या नावांचा वापर करत होते. इथे कामावर रुजू असलेल्या प्रत्येक कर्मचा-याला या नेत्यांच्या नावांसमोर स्वाक्षरी करावी लागत होती. माहिती अधिकारातून ही माहिती उघडकीस आली आहे.

Loading Comments