Advertisement

मतदान कार्ड डिजिटल स्वरुपात, निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

निवडणूक आयोग (Election Commission) लवकरच मतदान कार्ड डिजिटल स्वरुपात ( Digital Voter Cards) घेऊन येण्याच्या तयारीत आहे.

मतदान कार्ड डिजिटल स्वरुपात, निवडणूक आयोगाचा प्रस्ताव
SHARES

निवडणूक आयोग (Election Commission) लवकरच मतदान कार्ड डिजिटल स्वरुपात ( Digital Voter Cards) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. आधार कार्ड प्रमाणे डिजिटल स्वरुपात मतदान कार्ड ठेवता येणार आहे. त्याचबरोबर कागदी कार्ड देखील मतदारांना बाळगता येणार आहे.

सध्याच्या मतदान कार्डधारकांना हेल्पलाइन अॅपच्या माध्यमातून केवायसी (KYC) केल्यानंतर ही सुविधा उपलब्ध होईल. मतदारांना 'इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्ड' (EPIC) ही सुविधा सहज उपलब्ध करून देणं, हे निवडणूक आयोगाचं उद्दीष्टं आहे.

निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, नवीन मतदार इंटरनेटवरून आपलं मतदान कार्ड डाउनलोड करू शकतील. इतकंच नाही तर या डिजिटल कार्डच्या माध्यमातून ते त्यांचा मताधिकार बजावू शकणार आहेत.

याशिवाय मतदान कार्ड मिळण्यासाठी होणारी दिरंगाई आणि त्यामुळे होणारा त्रासही कमी होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या नोंदींमध्ये असलेल्या चालू मतदारांनाही याचा फायदा होणार आहे. या निर्णयानंतर मतदार डिजिटल स्वरूपात EPIC डाउनलोड करू शकणार आहेत.

एखाद्या मतदाराचे मतदान कार्ड हरवले तर आणि त्यानं नवीन कार्डसाठी अर्ज केला असेल तर त्याला डिजिटल कार्ड डाउनलोड करता येऊ शकेल. पण त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता मिळणं आवश्यक आहे. 

या प्रस्तावित डिजिटल मतदार कार्डमध्ये दोन क्यूआर कोड (QR) असतील. या कोडमधील माहितीच्या आधारे, इंटरनेटवरून डाउनलोड केलेल्या मतदान कार्डद्वारे मतदार मतदान करू शकतील.



हेही वाचा

पुढील २ दिवस मुंबईतील उकाडा कायम राहणार- IMD

मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करा, महापालिका आयुक्तांची मागणी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा