कुर्ला स्टेशनजवळ भिंत कोसळली, 4 जखमी

कुर्ला पश्चिमेकडच्या हरियाणावाला लेनवर भिंत कोसळल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • कुर्ला स्टेशनजवळ भिंत कोसळली, 4 जखमी
  • कुर्ला स्टेशनजवळ भिंत कोसळली, 4 जखमी
  • कुर्ला स्टेशनजवळ भिंत कोसळली, 4 जखमी
SHARE

कुर्ला स्टेशनबाहेर रेल्वेच्या हद्दीतली भिंत कोसळल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले असून तिघांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमिर असीम खान (58), लखन खताल (29), लक्ष्मण विष्णू पाटील (50) आणि मोहम्मद सिराज पंतोजी (30) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. तर यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमिर असीम खान (58) वर केईएममध्ये उपचार सुरू आहेत. 

IMG-20180907-WA0042.jpgकुर्ला पश्चिमेकडच्या हरियाणावाला लेनवर ही भिंत आहे. तब्बल 20 फुटांहून अधिक उंचीची ही भिंत असून सकाळी 9.30 च्या सुमारास ही भिंत कोसळली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून सध्या खाली पडलेला मलबा हटवून रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे.

IMG-20180907-WA0057.jpg

रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष

गेल्या काही महिन्यांपासून ही भिंत कमकुवत झाल्यानं एका बाजूला कलंडली होती. त्यमुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी या संरक्षक भिंतीबाबत तक्रार दाखल केली होती. याशिवाय स्थानिक आमदारांनीच रेल्वे प्रशासनाला तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्षच झालं आहे.

IMG-20180907-WA0038.jpg

आणि भिंत कोसळली 

या भिंतीच्या बाजुलाच 3 स्थानिक रहिवाशांच्या चाळी असून यामुळे स्थानिक राहिवशांचा चाळीत ये-जा करण्याचा रस्ता बंद झाला आहे. या भिंतीच्या बाजूलाच लखन खताल (29) या पानवाल्याचा ठेला असून सकाळची वेळ असल्यामुळे पानवाल्याच्या ठेल्यावर गर्दी होती. मात्र, अचानकच ही भिंत कोसळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.


पानवाल्याच्या डोक्याला दुखापत

या दुर्घटनेमध्ये लखन खताल (29) या पानवाल्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या