Advertisement

कल्याण-डोंबिवलीचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद

जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहाणार आहे.

कल्याण-डोंबिवलीचा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मोहिली येथील जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहाणार आहे.

उल्हास नदीवरील कल्याण डोंबिवली पालिकेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राला महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीकडून वीज पुरवठा होतो. हा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत कल्याण, डोंबिवली व ग्रामीण भागास होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

पालिकेच्या मोहिली येथील 150 दशलक्ष लीटर क्षमतेच्या उदंचन केंद्र आणि याच ठिकाणच्या जलशुध्दीकरण केंद्रास महावितरणच्या टाटा पाॅवर कांबा उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. या उपकेंद्रातील फीडरच्या देखभाल, दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत केले जाणार आहे.

यामुळे या उपकेंद्रातून मोहिली उदंचन आणि जलशुध्दीकरण केंद्रांना होणारा वीज पुरवठा बंद राहणार आहे. या दोन्ही केंद्रातून कल्याण, डोंबिवली शहरांना होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी 12 तासासाठी बंद राहणार आहे.

दुरुस्तीच्या कामामुळे कल्याण परिसरातील टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण भाग, डोंबिवली पूर्व, पश्चिम भाग, कल्याण पश्चिमेतील चिकणघर, भोईरवाडी, रामबाग, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रस्ता, अशोकनगर वालधुनी, शिवाजी नगर, जोशीबाग, बिर्ला महाविद्यालय ते खडकपाडा परिसर, कल्याण रेल्वे स्थानक भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा