Advertisement

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, धरणांमध्ये ६.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये अवघा ८८ हजार ७४३ दशलक्ष लिटर म्हणजेच ६.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं पावसानं योग्य वेळी हजेरी लावली नाही तर शिल्लक पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, धरणांमध्ये ६.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक
SHARES

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. त्यामुळं मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. महाराष्ट्रात मान्सून लांबल्यानं मुंबईसह राज्यभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये अवघा ८८ हजार ७४३ दशलक्ष लिटर म्हणजेच ६.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळं पावसानं योग्य वेळी हजेरी लावली नाही तर शिल्लक पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

राखीव पाणीसाठा

७ धरणांमध्ये ६.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं महापालिकेनं राखीव पाणीसाठा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हा पाणीसाठा पुरणार असल्याचा दावा पालिकेनं केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

अप्पर वैतरणा कोरडे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. अप्पर वैतरणा धरणात पाणी शिल्लक राहिलेलं नाही. मोडक सागर धरणात ४८ हजार ४७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. तर तानसा धरणात ६ हजार १८८ दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा धरणात २४  हजार २९५ दशलक्ष लिटर, भातसा धरणात ६ हजार ४३७ दशलक्ष लिटर, विहार धरणात १ हजार ३५४ दशलक्ष लिटर आणि तुलसी धरणात १ हजार ९९८ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.



हेही वाचा -

जगात सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी मुंबई १५२व्या स्थानी

उबर अॅपच्या माध्यमातून बेस्ट बसमधील सीटचं बुकींग?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा