Advertisement

मुंबईच्या धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ

धरण क्षेत्रात पावसाची अशीच स्थिती राहिली तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल.

मुंबईच्या धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ
SHARES

गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे (heavy rainfall) धरणात क्षेत्रात पाणीसाठा काही प्रमाणात वाढला आहे.

30 जून रोजी 6.75 टक्क्यांवर आलेला पाणीसाठा 1 जुलै रोजी 7.18 टक्क्यांवर पोहोचला आहे.

धरणातील (dams) पाणीसाठा पुन्हा एकदा 1 लाख 3 हजार 871 दशलक्ष लिटर वर पोहोचला आहे.

धरण क्षेत्रात पावसाची अशीच स्थिती राहिली तर पाण्याच्या पातळीत वाढ होईल आणि मुंबईवरील पाणीकपातीचे संकट दूर होईल.

दरम्यान, पवई तलाव (powai lake) बुधवारी पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास ओसंडून वाहू लागला.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबईची (mumbai) वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते.

सध्या सातही धरणात 1 जुलै रोजी 1 लाख 6 हजार 871 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

1 जुलै रोजी पाणीसाठा (टक्के)

  • अप्पर वैतरणा - 0

  • मोडक सागर - 20

  • तानसा - 2.72

  • मध्य वैतरणा - 11.71

  • भातसा - 4.90

  • विहार - 50.77

  • तुळशी - 28

1 जुलै रोजी सातही धरणातील तीन वर्षांतील पाणीसाठा

  • 2026 - 7.18 टक्के

  • 2025 - 41.17 टक्के

  • 2024 - 5.91 टक्के

30 जून रोजीचा पाणीसाठा (टक्के)

  • 2026 - 6.75 

  • 2025 - 40.22

  • 2024 - 5.46



हेही वाचा

सर्पदंशाला अधिसूचित आजार घोषित करण्याचा प्रस्ताव

मोठ्या मूर्तींना नैसर्गिक जलाशयात विसर्जनाची परवानगी कायम ठेवण्याची विनंती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा