दुरूस्तीच्या कामामुळे ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. तर दुरुस्तीनंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिकेनं सांगितलं आहे.
एमआयडीसी जांभूळ जलशुद्धीकरण येथील जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामं करणार आहे. त्यामुळे कळवा, खारेगाव, पारसिक नगर, आतकोनेश्वरनगर, विटावा, घोलाईनगर, रेतीबंदर, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, वागळे इस्टेट येथील इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड तसेच बाळकुम पाडा नं .१ या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा गुरुवारी २४ तास बंद राहणार आहे.
स्टेम प्राधिकरणही शुक्रवार आणि शनिवारी स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करणारी यंत्रणा दुरुस्तीचं काम करणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, चितळसर, मानपाडा, कोठारी कंपाउंड, पवारनगर, आझादनगर या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसंच शुक्रवारी रात्री ९ ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इटर्निटी, समता नगर तसेच मुंब्रा शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरूस्तीनंतरही पुढील काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा -
आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत