'येथे शौचालय बांधू नका'

 Teen Talao
'येथे शौचालय बांधू नका'

भक्ती भवन - स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेकडून शहरात विविध ठिकाणी फुटपाथवर शौचालयं बांधण्यात येत आहेत. अशाच प्रकारे चेंबूरमधील भक्ती भवन येथेही पालिकेकडून एका शौचालयाचं बांधकाम सुरू आहे. मात्र येथील स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी या शौचालयाला विरोध केला आहे. या शौचालयाला लागून साखरफुटाणे तयार करण्याचा कारखाना आहे. इथे हे शौचालय बांधल्यास याठिकाणी मोठी दुर्गंधी पसरेल. त्यामुळं हे शौचालय अन्यत्र हलवावं, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशी सुभाष मराठे यांनी केली आहे. तसं पत्रही त्यांनी पालिकेला दिलं असून पालिकेन यावर तात्काळ विचार करावा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Loading Comments