Advertisement

सांताक्रूझ स्थानकातील 'या' पुलाच्या पायऱ्या बंद

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ वरील मध्यभागी असलेल्या पुलाच्या पायऱ्या बंद करण्यात येणार आहेत.

सांताक्रूझ स्थानकातील 'या' पुलाच्या पायऱ्या बंद
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुझ स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ वरील मध्यभागी असलेल्या पुलाच्या पायऱ्या बंद करण्यात येणार आहेत. दुरूस्तीच्या कामासाठी या पायऱ्या बंद करण्यात येणार आहेत. या काळात प्रवाशांनी पुलाच्या पश्चिम दिशेकडील पायऱ्यांचा वापर करण्याचं आवाहन पश्चिम रेल्वेनं केलं आहे. 

दुरूस्तीचं काम

सांताक्रूझ स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पुलाच्या दक्षिण दिशेकडील पायऱ्या दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. गुरुवार-शुक्रवार ऑक्टोबरच्या मध्यरात्री ते शनिवार १६ नोव्हेंबर या कालावधीत या पायऱ्यांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडीट

अंधेरी स्थानकातील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनानं मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पुलांचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील अनेक पादचारी पूल दुरूस्तीच्या कामसाठी बंद आहेत. या नियमीतपणे या पूलांवरून जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.  हेही वाचा -

मुंबईत साथीच्या आजारांसह मलेरिया, डेंग्युचा धोका वाढला

रेल्वे स्थानक व परिसरातील फेरीवाल्यांविरोधात २२ हजार गुन्हेसंबंधित विषय
Advertisement