Advertisement

वांद्रे स्टेशनवर स्वतंत्र स्तनपान कक्ष


वांद्रे स्टेशनवर स्वतंत्र स्तनपान कक्ष
SHARES

मुंबईच्या वांद्रे स्टेशनवर महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी स्वतंत्र कक्ष बनवण्यात आला आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकात पहिल्यांदाच अशा प्रकारे स्तनपान कक्ष बनवण्यात आला आहे.


ही सुविधा आणखी कुठे उपलब्ध होणार?

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, वांद्रे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 1 वर असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळच ही खोली बांधण्यात आली आहे. ही सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मुंबई सेंट्रल या स्थानकाबरोबरच लांबचा प्रवास करताना लागणाऱ्या स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर देखील स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावर महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी जास्तीत जास्त स्तनपान कक्ष उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.


हेही वाचा - 

आई तुझा स्तनपानावर भरोसा नाय काय?, वाडिया रुग्णालयाकडून जनजागृती


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा