Advertisement

मुंबईकरांना अनुभवता येणार ड्राइव्ह इन थिएटरचा अनुभव

PVR द्वारे संचालित जिओ ड्राईव्ह इनमध्ये २९० कारची क्षमता आहे.

मुंबईकरांना अनुभवता येणार ड्राइव्ह इन थिएटरचा अनुभव
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीजनं (Reliance Industries) नुकतंच जगातील पहिल्या रुफ टॉप, खुल्या (ओपन एअर) (world’s first rooftop open-air) जिओ ड्राईव्ह इन थिएटर (Jio Drive-in Theatre) ची घोषणा केली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) – Bandra Kurla Complex (BKC) परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह (Jio World Drive (JWD) इथं ५ नोव्हेंबर रोजी हे ओपन एअर थिएटर सुरू होईल.

PVR द्वारे संचालित जिओ ड्राईव्ह इनमध्ये २९० कारची क्षमता आहे. शहरातील सर्वात मोठ्या सिनेमा स्क्रीन प्रेक्षकांना अतुलनीय सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी सुसज्ज आहे. विशेषतः सध्याच्या काळात स्वतःच्या कारमधून चित्रपट पाहण्याचा एक अनोखा अनुभव देईल” असे रिलायन्सतर्फे सांगण्यात आले आहे.

लवकरच जिओ वर्ल्ड ड्राईव्ह इथं नाईन डाईन हे एक मल्टी-क्युझिन कॅज्युअल-डाइन लाँच होणार आहे. जे जागतिक पातळीवरील नऊ खाद्यसंस्कृतींचा एकत्रित अनुभव देईल. म्हणजेच कारमध्ये बसल्या जागी तुम्हाला मनपसंत जेवणाचाही अनुभव घेता येईल.

मनोरंजन, खाद्य आणि रिटेल क्षेत्रात भारतातील हा पहिला अनुभव असेल. हे ड्राईव्ह इन थिएटर सर्वोत्तम जागतिक अनुभव भारतात आणण्याच्या दृष्टीनं आणि जगाला सर्वोत्तम भारत दाखवण्याच्या दृष्टीकोनानं बांधलं गेलं आहे.

खरं तर वांद्र्याच्या रहिवाशांसाठी ड्राईव्ह इन थिएटर ही संकल्पना नवीन नाही. कलानगर भागात मिठी नदीजवळच्या खारफुटी जमिनीवर ७० च्या दशकात हे ड्राईव्ह इन थिएटर उभं राहिलं होतं. त्यावेळी मोजक्या लोकांकडे स्वतःची चारचाकी असायची.

त्यामुळे ड्राईव्ह इन थिएटर हे उच्चभ्रू व्यक्तींची मक्तेदारी मानली जात असे. २००३ मध्ये या थिएटरला घर-घर लागली आणि ते पाडण्यात आलं. त्यानंतर जवळपास अठरा वर्षांनी प्रेक्षकांना याची पुन्हा अनुभूती घेता येणार आहे.

“जिओ वर्ल्ड ड्राईव्हसह, आम्ही जगभरातील सर्वोत्कृष्ट किरकोळ आणि मनोरंजन अनुभव मुंबईत आणत आहोत. हे केवळ एक ब्रँड किंवा ठिकाण नाही, तर वैयक्तिक अनुभवांचे संपूर्ण नवीन जग आहे, जे ग्राहकांना अभूतपूर्व पद्धतीनं गुंतवून ठेवेल. ही दृष्टी जिओ ड्राईव्ह-इन थिएटरच्या उद्घाटनामुळे मुंबईकरांना आणखी एक नवीन अनुभव देईल” असं इशा अंबानी म्हणाल्या.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा