Advertisement

वरळीतील अभ्यासगल्ली आणि जांबोरी मैदानाचा होणार कायापालट

वरळीच्या अभ्यासगल्लीचा आणि जांबोरी मैदानाचा लवकरच पालिकेतर्फे कायापालट केला जाणार आहे.

वरळीतील अभ्यासगल्ली आणि जांबोरी मैदानाचा होणार कायापालट
SHARES

वरळीच्या अभ्यासगल्लीचा आणि जांबोरी मैदानाचा लवकरच पालिकेतर्फे कायापालट केला जाणार आहे. अभ्यासगल्लीत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गात असतात तशी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. तर जांबोरी मैदानाच्या कडेने ४.५ मीटरची धावपट्टी (जॉगिंग ट्रॅक) उभारण्यात येणार आहे.

वरळी परिसरातील चाळींत लहान-लहान घरांत राहणारे अनेक विद्यार्थी या शांत गल्लीतील झाडांखाली बसून अभ्यास करतात. अभ्यासगल्ली अशी ओळख असलेल्या या रस्त्याचा कायापालट करण्याचे पालिकेच्या जी दक्षिण विभागानं ठरवलं आहे.

या रस्त्याची ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पदपथावर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बाक , दिवे, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृहे अशी अगदी शाळा किंवा महाविद्यालयांप्रमाणे सर्व सोय केली जाणार आहे. या दोन्ही कामांचा खर्च दोन कोटींपर्यंत आहे.

हा संपूर्ण १२ मीटर रुंदीचा आणि ३०० मीटर लांब रस्ता आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन-तीन मीटरचे पदपथ असून त्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला पूरक असं वातावरण, सुविधा दिल्या जाणार आहेत. रस्त्याचं काम रस्ते विभागामार्फत केलं जाणार आहे. तर पदपथांचे सुशोभीकरण विभाग कार्यालयामार्फत होणार आहे.

पदपथावर विद्यार्थ्यांना वाचनाकरिता खास जागा तयार केली जाणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतीही अभ्यासाशी संबंधित चित्रांनी सजवणार आहेत. भिंतीवर पुस्तकांचे बारकोडही रंगवण्यात येणार आहे. हे बारकोड स्कॅन करून विद्यार्थ्यांना मोबाइलवर पुस्तके वाचता येतील.

बीडीडी चाळींच्या मधोमध असलेल्या जांबोरी मैदानाचे रूपही येत्या काही काळात पालटणार आहे. सुमारे १० हजार चौरस मीटरहून अधिक मोठ्या असलेल्या या मैदानात धावपट्टी (जॉगिंग ट्रॅक) तयार करण्यात येणार आहे.

या मैदानाची लाल मातीची ओळखही तशीच ठेवली जाणार आहे. मात्र मैदानाच्या खाली पावसाचे पाणी शोषून घेऊन त्याचा निचरा करणारी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसंच मैदानाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, लहान मुलांसाठी खेळणी आदी उपलब्ध करण्यात येणार आहे.



हेही वाचा

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

क्रॉफर्ड मार्केटजवळील मच्छी मार्केटचा तळ मजला जमीनदोस्त होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा