Advertisement

'आधी डेब्रिज उचला, मग सायकल ट्रॅक बांधा'

वाकोला, माहीम, घाटकोपर आदी भागांतील झोपड्यांचं डेब्रिज रस्त्यावर पडून असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सायकल ट्रॅक केव्हाही बांधा पण, आधी तोडलेल्या झोपड्यांचं डेब्रिज हटवा, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

'आधी डेब्रिज उचला, मग सायकल ट्रॅक बांधा'
SHARES

मुंबई पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी लगतच्या झोपड्या तोडून दोन्ही बाजूला प्रत्येकी १० मीटरची जागा मोकळी करण्यात आली आहे. या मोकळ्या झालेल्या जागेवर आता महापालिका सायकल ट्रॅक बनवत आहे. परंतु वाकोला, माहीम, घाटकोपर आदी भागांतील झोपड्यांचं डेब्रिज रस्त्यावर पडून असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सायकल ट्रॅक केव्हाही बांधा पण, आधी तोडलेल्या झोपड्यांचं डेब्रिज हटवा, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.


घाणीत भर

तानसा लगतच्या झोपड्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केली जात आहे. पात्र कुटुंबांना पर्यायी घरेही दिली जात आहे. परंतु या तोडलेल्या झोपड्यांच्या दगड विटांचं डेब्रिज अद्याप रस्त्यावर पडून असल्याचं शिवसेना नगरसेवक सदा परब यांनी सांगितलं. साताक्रूझच्या वाकोला भागात या तोडलेल्या बांधकामांचं डेब्रिज तसंच पडून असल्याने तिथं कुत्रे, मांजर घाण करत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचं परब यांनी सांगितलं.



भिंतीआड अनैतिक धंदे

८ वर्षांपूर्वी माहिममध्ये तानसा लगतच्या झोपड्या तोडून त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आल्या आहेत. परंतु याठिकाणी या झोपड्या तोडल्यानंतर जॉगिंग ट्रॅक बांधण्याची मागणी ८ वर्षांपूर्वी केली होती. तरीही अजून इथं ना जाॅगिंग ट्रॅक आला, ना सायकल ट्रॅक.

प्रशासनाच्या मनात आले की कधी सायकल आणि तर कधी जॉगिंग ट्रॅक बनवण्याच्या बाता मारायच्या, असा प्रकार सुरु असल्याचं सांगत शिवसेनेचे मिलिंद वैद्य यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने इथं केवळ भिंती उभारुन ठेवल्याने, या भिंती फोडून त्यात अनैतिक धंदे होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


मूलभूत समस्या दूर करा

या जलवाहिनीच्या भोवती आमचे कोळीबांधव राहत होते. त्यांच्याकडे पुरावेही आहेत. परंतु त्यांना दूरवर घरे देण्यात आली. पोटापाण्याचा व्यवसाय सोडून जाण्याऐवजी त्यांनी इथंच भाड्याने राहणं पसंत केलं. त्यामुळे ज्यांच्याकडे पुरावे नाही, त्या रहिवाशांचा विचार न करता, आधी इथले मूलभूत प्रश्न दूर करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.



हेही वाचा-

खोदा पहाड, निकला... १ किमी सायकल ट्रॅकसाठी ११ कोटींचा खर्च

बहुचर्चित सायकल ट्रॅकचा प्रस्ताव डोळेबंद करून मंजूर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा