Advertisement

झोमॅटो दारू घरपोच पोहचवणार?

दारू देखील ऑनलाईन उपलब्ध व्हावी आणि घरपोच त्याची डिलिव्हरी केली जावी, अशी मागणी होऊ लागली. लोकांच्या या मागणीला झोमॅटोनं मनावर घेतलेलं दिसतंय.

झोमॅटो दारू घरपोच पोहचवणार?
SHARES

काही दिवसांपूर्वी निघालेल्या अध्यादेशात दारू दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. पण दारू दुकानाच्या बाहेर जमणारी गर्दी आणि लोकांकडून लॉकडाऊनचं होणारं उल्लंघन पाहता हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे दारू देखील ऑनलाईन उपलब्ध व्हावी आणि घरपोच त्याची डिलिव्हरी केली जावी, अशी मागणी होऊ लागली. लोकांच्या या मागणीला झोमॅटोनं मनावर घेतलेलं दिसतंय.

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आता भारतात दारूची डिलिव्हरी करण्याच्या विचारात आहे. या संदर्भात रॉयटर्सनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सध्या दारूची मागणी वाढली आहे. झोमॅटोनं या आधीच किराणा सामानाची डिलिव्हरी सुरू केली आहे.

सध्या भारतात घरपोच दारूचे वितरण करण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. मात्र इंटरनॅशनल स्पिरिट्स आणि वाईन्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयएसडब्ल्यूएआय) याची सुरूवात करण्यासाठी लॉबिंग करत आहे. झोमॅटोचे फूड डिलिव्हरीचे सीईओ मोहित गुप्ता यांनी आयएसडब्ल्यूएआय लिहिलं की, आम्हाला विश्वास आहे की टेक्नोलॉजीच्या मदतीनं वितरण केल्यानं दारूच्या विक्रीत वाढ होईल.

सध्या भारतात वेगवेगळ्या राज्यात दारू विक्रिवर बंदी घालण्यात आली आहे. आयएसडब्ल्यूएआयचे एक्झिक्यूटिव्ह चेअरमन अम्रित किरण सिंह म्हणाले की, राज्यांनी दारूच्या वितरणाची परवानगी द्यावी. जेणेकरून लॉकडाऊनमुळे राज्याला झालेले नुकसान भरून निघेल.



हेही वाचा

अत्यावश्यक सेवेसाठी पोलिसांनी वाटले 3 लाख झटपट पास!

२६/११ हल्ल्यातील साक्षीदार मुंबईच्या रस्त्यावर जगतोय आयुष्य

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा