मीरा-भाईंदर महानगरपालिकेविरोधात त्याचा एल्गार

भाईंदर - न्यू गोल्डन नेस्ट परिसरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यासाठी जिद्दी मराठा या संस्थेचा एक सदस्य धरण्यावर बसला आहे. गेल्या दहा दिवसांपासून मीरा भाईंदर नगरपालिकेच्या मुख्यालयासमोर प्रदीप जंगम धरण्यावर बसला आहे. तीन वर्षांपूर्वी हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करण्यात आला.  दोन वर्षांपूर्वी शिवसेना-भाजपाची सत्ता आली. पण यांनाही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करण्यात अजून यश आले नाही. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर 20 करोड खर्च करण्यात आले. पण, याच्या कामाचा दर्जा चांगला नाही. कॉम्प्लेक्सच्या इमारतीला जागोजागी तडे गेलेत. स्विमिंग पुलमध्ये घाणेरडे पाणी साचले आहे.

"जनता दलचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे यांनी यासाठी मीरा-भाईंदर नगरपालिका अधिकारी आणि राजकीय नेत्यांना जबाबदार ठरवले आहे." तर भाजपाचे माजी नगरसेवक प्रकाश गरोडिया यांनी म्हटले की, "खेळ विश्वातल्या मुलांसाठी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लवकरात लवकर सुरू करणे आवश्यक आहे.

"तर जोपर्यंत हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सामान्यांसाठी खुले होत नाही तोपर्यंत मी धरण्यावर बसणार आहे. धरण्यावर बसून दहा दिवस झाले. या झोपलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी दशक्रियाविधी आणि तेरावाही करणार आहे," असं प्रदीप यांनी या वेळी स्पष्ट केले.

Loading Comments