चणाडाळ होणार स्वस्त

  Mumbai
  चणाडाळ होणार स्वस्त
  मुंबई  -  

  दिवाळी सणाच्या तोंडावर राज्य सरकार 70 रूपयात डाळ विकणार आहे. मुंबईसोबत इतर सात राज्यांमध्ये 70 रूपयात डाळ लवकरच उपलब्ध होणाराय. केंद्र सरकारनं राज्य सरकारला 700 मेट्रीक टन डाळ दिलीय. त्यामुळे मुंबईसोबत पुणे, नाशिक,औरंगाबाद, नागपूर, अमरावतीमध्ये ही स्वस्त डाळ उपलब्ध होईल.

  दिवाळीसाठी चणाडाळीची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होते. नेमकी या सणाच्या तोंडावरच चणाडाळीचे भाव प्रति किलो १५० रुपयांच्या वर गेले आहेत. त्याचा विचार करून सर्वसामान्यांनाही चणाडाळ खरेदी करता यावी, यासाठी दर कमी करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागानं केला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.