बोरिवलीकरांसाठी ताजी ताजी भाजी

बोरिवली - तुम्हाला ताजी मस्त आणि स्वस्त भाजी हवीय का? मग भेट द्या बोरिवलीमध्ये भरलेल्या या आठवडी बाजाराला. दीपलक्ष्मी महिला सेवा सहकारी संस्थेच्या वतीने हा आठवडी बाजार भरवण्यात आलाय. ज्याचे उद्घाटन बुधवारी प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सुरुवातीला या आठवडी बाजाराला काही लोकांकडून विरोध होत होता. मात्र या सगळ्यावर आयोजिका दीपा पाटील यांनी मात केली. दर बुधवारी सकाळी 8 ते दुपारी 1 यावेळेत ताजी आणि स्वस्त भाजी मुंबईकरांना इथे विकत घेता येणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला जावे लागणार आहे, या आठवडी बाजारात.

Loading Comments 

Related News from कमॉडिटी मार्केट