Advertisement

IPL 2021: लाइव्ह प्रक्षेपण टीममधील १४ जणांना कोरोनाची लागण

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला सामना येत्या ९ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे.

IPL 2021: लाइव्ह प्रक्षेपण टीममधील १४ जणांना कोरोनाची लागण
SHARES

इंडियन प्रिमियर लिग (ipl) २०२१ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिला सामना येत्या ९ एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. मात्र, देशावर असलेल्या कोरोनाचं संकट हे आयपीएलवर सुद्धा ओढवलं आहे. आयपीएलच्या हंगामात कोरोनानं शिरकाव केल्यानं बायो बबलमधील १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

१४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची (coronavirus) लागण झाल्यानं आयपीएलच्या खेळावर कोरोनाचे सावट आले आहे. हे १४ सदस्य लाइव्ह प्रक्षेपणाच्या (live streaming workers) तांत्रिक टिममधील असल्यामुळं आयपीएल व्यवस्थापनाच्या चिंता वाढली आहे. परंतु आता बीसीसीआय आणि आयपीएल व्यवस्थापन कमिटीची चिंता वाढली असल्याचं दिसतं आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या १४ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी केली असता चाचणी अहवास सकारात्मक आला आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये कॅमेरामॅन, निर्माता, दिग्दर्शक, लाइव्ह स्लोमोशन आणि ग्राफिक्स एडीटर आणि व्हिडिओ एडीटरचा समावेश आहे. १४ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळं स्टार ग्रुपची चिंता वाढली आहे. कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास स्टारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व सदस्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा खेळाडू देवदत्त पलिक्कडला कोरोनाची लागण झाली होती तर दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्शर पटेलला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली होती. या दोघांनाही क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल २०२१ ही ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचे म्हटले आहे.



हेही वाचा

NCBच्या ताब्यात असलेला एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह

MIDC चा सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा