Advertisement

अाकाश पारकरचा शेवटच्या बाॅलवर सिक्सर, ट्रम्प नाइट्सचा विजय


अाकाश पारकरचा शेवटच्या बाॅलवर सिक्सर, ट्रम्प नाइट्सचा विजय
SHARES

शेवटच्या षटकांत जिंकण्यासाठी २० पेक्षा अधिक धावांची गरज... विनायक भोईरने पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकत सामन्यात निर्माण केलेली रंगत... शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज... सर्वांच्या नजरा अाकाश पारकरवर खिळलेल्या... प्रशांत भोईरने बाॅल टाकायला सुरुवात केली... सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढलेले... अाकाश पारकरने चेंडूवर जणू हातोडाच मारला... चेंडू सीमारेषेपार भिरकावत अाकाश पारकरने ट्रम्प नाइट्सला अटीतटीच्या रंगलेल्या या सामन्यात चित्तथरारक विजय मिळवून दिला. ट्रम्प नाइट्स मुंबई नाॅर्थ ईस्ट संघाने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० मुंबई लीगमधील या सामन्यात नमो वांद्रे ब्लास्टर्सला पाच विकेट्सनी पराभूत करत प्रेक्षकांना थरारक सामन्याची अनुभूती मिळवून दिली. या विजयासह ट्रम्प नाइट्सने सहा गुणांसह अग्रस्थानी झेप घेतली अाहे.


दोन षटकांत कुटल्या ४४ धावा

नमो वांद्रे ब्लास्टर्सचे १८४ धावांचे उद्दिष्ट गाठताना ट्रम्प नाइट्सला विजयासाठी अखेरच्या दोन षटकांत ४४ धावांची अावश्यकता होती अाणि त्यांच्याकडे पाच विकेट्स शिल्लक होत्या. अझर अन्सारीच्या १९व्या षटकांत अाकाश पारकरने दोन षटकार अाणि दोन चौकार लगावत सामन्यात रंगत निर्माण केली. अखेरच्या षटकांतही धुव्वाधार फलंदाजी करत ट्रम्प नाइट्सने विजय साकारला. पारकरने १८ चेंडूंत २ चौकार अाणि ४ षटकारांसह ३९ धावांची नाबाद खेळी केली. त्याला चांगली साथ देत विनायक भोईरने ८ चेंडूंत २ षटकारांनिशी १९ धावा फटकावल्या. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अवघ्या १६ चेंडूंत ५० धावांची अभेद्य भागीदारी रचली.


श्रेयस, अमन खानची तुफान फटकेबाजी

दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरच नमो वांद्रे ब्लास्टर्सला केविन अल्मेडाच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यर अाणि अमन हकिम खान यांची तुफान फटकेबाजी प्रेक्षकांनी अनुभवली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचत ट्रम्प नाइट्सच्या गोलंदाजांची कत्तल केली. श्रेयसने ५७ चेंडूंत दोन चौकार अाणि पाच षटकारांसह ७२ धावा करत या स्पर्धेतील अापलं तिसरं अर्धशतक साजरं केलं. अमन खानने ४७ चेंडूंत ६ चौकार अाणि ६ षटकारांनिशी ८५ धावा कुटल्या. त्यामुळे नमो वांद्रे ब्लास्टर्सला २० षटकांत ५ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारता अाली होती.


हेही वाचा -

अर्जुन तेंडुलकरची टी-२० मुंबई लीगमधून माघार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा