Advertisement

भारत विरुद्ध इंग्लंडमधील कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

भारत विरुद्ध इंग्लंडमधील ४ कसोटी सामन्यांची मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यातील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंडमधील कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा
SHARES

भारत विरुद्ध इंग्लंडमधील ४ कसोटी सामन्यांची मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यातील पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीनं १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. कॅप्टन विराट कोहलीसह हार्दिक पंड्या, इशांत शर्माचं संघात पुनरागमन झाले आहे. 

 विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे. तर अजिंक्य रहाणेवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पृथ्वी शॉ, टी नटराजन आणि नवदीप सैनीला संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. तर अक्षर पटेलला पहिल्यांदाच कसोटीत स्थान देण्यात आलं आहे.

इशांत शर्माने फेब्रुवारी २०२० मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले होते. तर हार्दिक पांड्या २०१८ नंतर पहिली कसोटी खेळणार आहे. 

मंगळवारी भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केली. ३२ वर्षानंतर भारताने २-१ ने कसोटी मालिका जिंकली. मात्र, भारतासाठी पुढचे आव्हान असणार आहे.नवीन निवड समितीने १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे.हेही वाचा -

विजयानंतर भारतीय संघाला बीसीसीआयकडून मिळालं 'हे' सरप्राइज गिफ्ट

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, कसोटी मालिका २-१ ने जिंकलीसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा