Advertisement

चाहते सोडून गेल्यास मानधनात कपात, बीसीसीआयचा विराटला घरचा आहेर


चाहते सोडून गेल्यास मानधनात कपात, बीसीसीआयचा विराटला घरचा आहेर
SHARES

चाहत्याला देश सोडून जाण्यास सांगणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा व्हिडिओ सध्या चांगलाचा व्हायरल होत असून, विराटच्या व्यक्तव्यावर ट्रोलर्सनी त्याला चांगलंच झोडून काढलं आहे. यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)चे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनीही विराटला सुनावलं आहे. एवढंच नाही, तर चाहत्यांनी पाठ फिरवल्यास, बीसीसीआय आणि खेळाडू दोघेही अडचणीत येतील, असं म्हणत त्याला घरचा आहेर दिला आहे.


चाहत्यांचा सन्मान

'बीसीसीआयमध्ये आम्ही क्रिकेटच्या चाहत्यांचा सन्मान करतो तसंच, त्यांची आवड-निवड आम्हाला महत्वाची वाटते. मला 'सुनील गावस्कर' यांना फलंदाजी करताना पहायला आवडायचं. तसंच, त्यावेळी 'गॉर्डन ग्रीनीज’, 'डेसमंड हेन्स’, 'विव्ह रिचर्ड्स' यांचीही फलंदाजी पाहायला मला आवडायचं. त्याचप्रमाणे, मला 'सचिन’, 'विरेंद्र सेहवाग’, 'सौरभ गांगुली’, 'व्ही. व्ही. एस. लक्ष्मण’, 'राहुल द्रविड' यांचा खेळ खूप आवडायचा. पण, 'मार्क वॉ’, 'ब्रायन लारा' आणि इतर परदेशी खेळाडूंची खेळीही मला तितकीच आवडायची', असं बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

क्रिकेटच्या कौशल्याचं कौतुक

'शेन वॉर्न' याला फिरकी गोलंदाजांपैकी एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मला पाहायला आवडायचं. तर 'अनिल कुंबळे' याला गोलंदाजीही मला चांगली वाटायची. 'कपिल देव' यांचा खेळ मला जितका आवडायचा तितकाच 'रिचर्ड हॅडली’, 'इयान बोथम' आणि 'इम्रान खान'चा खेळ आवडायचा. मला वाटतं असं करणं म्हणजे क्रिकेट खेळण्याच्या कौशल्याचं कौतुक करणं आहे. तसंच, या कौतुकात देश किंवा इतर कोणत्याही गोष्टींचं बंधन ठेऊ नये, असंही त्यांनी म्हटलं आहे.


तर, मानधनाला कात्री

विराटला हे लक्षात घ्यायला हवं की तो म्हणतो त्याप्रमाणे चाहते जर दुसऱ्या देशात गेले तर मोठ्या कंपन्या त्याच्यासोबत १०० कोटींचे करार करणार नाहीत. याचा परिणाम बीसीसीआयच्या कमाईवर देखील होऊ शकतो. आणि असं झालं तर, खेळाडूंच्या मानधानाला कात्री लागेल.


याआधीही कराराचं उल्लंघन

विराटनं बीसीसीआयबरोबर केलेला करार पाहिला तर त्याच्या लक्षात येईल की, 'हा देश सोडून जा' या वक्तव्यामुळे त्यानं करारातील काही नियमांचा भंग केला आहे. त्याने याआधी बीसीसीआयनं नाइकी कंपनीसोबत केलेला करार मोडून प्युमाच्या कार्यक्रमासाठी इंग्लंडला जात करार मोडला होता, यावर देखील चौधरी यांनी लक्ष वेधलं.



हेही वाचा- 

...तर भारतातून निघून जा; विराट कोहलीचा चाहत्याला सल्ला

रोहितने मोडला विराटचा विक्रम; टी २० मध्ये बनवल्या सर्वाधिक धावा



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा