Advertisement

Coronavirus Updates: 'हा' भारतीय गोलंदाज १०० गरीबांना करतोय अन्नदान

लॉकडाऊनच्या काळात गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Coronavirus Updates: 'हा' भारतीय गोलंदाज १०० गरीबांना करतोय अन्नदान
SHARES

लॉकडाऊनच्या काळात गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी अनेक दिग्गजांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या दिग्गजांपाठोपाठ भारताचा युवा गोलंदाजही मदतीसाठी पुढे आला आहे. भारताचा युवा गोलंदाज इशान पोरेलनं पंतप्रधान सहाय्यता निधीत आर्थिक मदत करण्याबरोबरच १०० गरीबांची जबाबदारी घेतली आहे.

क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, मेरी कोम आदी सर्वांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली आहे. २०१८च्या युवा वर्ल्ड कप (१९ वर्षांखालील) विजेत्या संघातील सदस्य असलेल्या बंगालच्या पोरेलनं कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करायला हवं, असं म्हटलं आहे. 

स्थानिक गरीब कुटुबीयांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्धार केला असून, या निर्धारात त्याचे कुटुंबीयही सहभागी आहेत. 'सर्वांना आपापल्या परीनं गरजूंना मदत करायला हवी. मी माझ्याकडून मदत करत आहे. त्याशिवाय मी येथील गरीब कुटुंबांना जेवण पुरवण्याचं काम करत आहे. पुढील दोन दिवस माझ्या आई-वडिलांसह मी या कुटुंबांना अन्न पुरवणार आहोत', असं त्यानं म्हटलं आहे.



हेही वाचा -

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्यात येणार

९वी व ११वीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा