Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

'गब्बर' धवनला लागलेलं दुखापतीचं ग्रहण काही सुटेना

सतत होणाऱ्या दुखापतीमुळं शिखर धवनचं मर्यादित क्रिकेटमधील स्थान धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'गब्बर' धवनला लागलेलं दुखापतीचं ग्रहण काही सुटेना
SHARE

भारतीय संघाचा सलामीवीर व 'गब्बर' (Gabbar) अशी ओळख असलेल्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याला लागलेलं दुखापतींचं (Injure) ग्रहण कमी होण्याचं चिन्ह दिसत नाहीये. कारण वर्ल्ड कपनंतर (World Cup 2019) धवन पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळं शिखर धवनला न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्याला मुकावं लागणार आहे. त्याशिवाय, सतत होणाऱ्या दुखापतींमुळं त्याचं मर्यादित क्रिकेटमधील (Cricket) स्थान धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२०१९ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात  त्याच्या अंगठ्याला दुखापत (Thumb Injury) झाली. नेमकी अंगठ्यालाच दुखापत झाल्यानं मोठी दुखापत झाली. परिणामी शिखरला हातात बॅट (Bat) धरून खेळणं कठीण झालं होतं. याबाबत धवननं सोशल मीडियावर (Social Media) माहिती देखील दिली होती. मात्र, त्यावेळी दुखापतीतून सावरण्यासाठी महिन्याचा कालावधी लागणार असल्यानं धवनची पुन्हा भारतात रवानगी करण्यात आली. त्यावेळी पर्यायी म्हणून त्याच्याजागी रिषभ पंत (Rishabh Pant) याची निवड करण्यात आली व त्याला संघात स्थान देण्यात आलं.

शिखर धवन विश्वचषक २०१९ मधून बाहेर गेल्यानं भारतीय संघाला (Indian Cricket Team) मोठा धक्का बसला होता. कारण अनुभवी धवनची (Experience player) संघाला गरज असताना त्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर धवनला काही दिवस शिखर धवनला निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर धवननं एक सोशल मीडियावर शेअर केला.

या व्हिडीओमध्ये भावूक धवन यानं 'तुम्ही दिलेलं प्रेम आणि शुभेच्छांचे आभार. दुर्देवानं माझा अंगठा दुखापतीतून लवकर बरा होऊ शकत नाही. मला वर्ल्डकपमध्ये (World Cup 2019) खेळायचे होते तसेच देशाचे प्रतिनिधित्व करायचं होतं, मात्र आता वेळ आली आहे मला मायदेशी परतावे लागेल आणि या दुखापतीतून सावरावे लागेल. यामुळे मी पुढील सिलेक्शनसाठी स्वत:ला तयार करू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे की आमचे खेळाडू चांगली कामगिरी करत राहतील. आमच्यासाठी प्रार्थना करत राहा आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद सगळ्यांचे, स्वत:ची काळजी घ्या', असं म्हटलं होतं.

अंगठ्याला झालेल्या दुखापतीमधून सावरल्यानंतर धवन यानं पुन्हा फलंदाजीच्या सरावाला सुरूवात केली. मात्र, वर्ल्ड कपधील दुखापतीनंतर शिखर धवनचं (Shikhar Dhawan) नशीब काही बदलण्याचं नाव घेत नव्हतं. चांगल्या फलंदाजीच्या सरावामुळं शिखर धवनची सईद मुश्ताक अली स्पर्धेसाठी (Saeed Mushtaq Ali Trophy) निवड करण्यात आली होती. परंतु, या स्पर्धेत महाराष्ट्राविरुद्ध (Maharashtra) झालेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळं धवनला पुन्हा विश्रांती देण्यात आली.

यावेळी देखील धवनची दुखापत गंभीर असल्यानं त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) टी-२० मालिकेला मुकावं लागलं. तसंच, धवनच्या जागी संजू सॅमसनला (sanju samson) संधी देण्यात आली. मात्र, या मालिकेदरम्यान भारतीय संघाला सलामीवीर शिखर धवनची (Shikhar Dhawan) कमी जाणवली. 

दरम्यान, मागील काही वर्षांमध्ये भारतीय संघात नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या फलंदाजांसह गोलंदाजांना देखील संधी देण्यात आली आहे. त्यामुळं एकीकडं संघातील खेळाडूंचं इनकमींग (In-coming) आणि शिखर धनवचे दुखापतीमुळं आऊटगोईंग (Out-going) यामुळं त्याचं मर्यादित क्रिकेटमधील स्थान धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे.

भारतीय संघात सलामीवीर धवनच्या जागी के. एल. राहुलची (K. L. Rahul) वर्णी लागली. चांगला खेळ करत राहुल यानं आपली निवड सार्थ ठरवली. तसंच, धवनच्या अनुपस्थितीत राहुलनं सलामीवीर म्हणून रोहित शर्मालाही (Rohit Sharma) चांगली साथ दिली. रोहित-राहुल यांच्या जोडीनं भारतीय संघाला उत्तम सलामीवीर म्हणून पर्याय उपलब्ध करून दिला. तसंच, यांच्या जोडीनं मोठ्या धावसंख्येसाठी भागीदारी (Partnership) साकारत, काही विक्रमांना (Records) गवसणी घातली.

दरम्यान, सईद मुश्ताक अली स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर शिखर धवन पुन्हा संघात पुनरागमन केलं. त्यामुळं भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला. शिखर धवनची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) एकदिवसीय मालिकेसाठी व न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. यावेळी दोन सामन्यात दमदार फलंदाजी करत त्यानं आपण फिट असल्याचं स्पष्ट केलं. पण असं म्हणतात की, 'लागलेली पनवती सुटत'... असंच काहीस धवन सोबत झालंय. कारण, संघात पुनरागमन केल्यानंतर दुसऱ्याच सामन्यात पुन्हा त्याला दुखापत झाली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात धवननं चांगली फलंदाजी केली. परंतु, क्षेत्ररक्षणाच्या वेळी पॅट कमिन्स याचा बॉल अडवताना. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर त्याला तातडीनं विश्रांती देण्यात आली. यावेळी देखील धवनच्या जागी सलामीवीर म्हणून के. एल. राहुलनं बाजू सांभाळली. त्यानंतर काहीच दिवसात येऊन ठेपलेल्या दौऱ्याला शिखर धवन जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, दुखापत गंभीर असल्यानं त्याला याही दौऱ्याला मुकावं लागलं आहे.

भारतीय संघ न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालवधीत ५ टी २० सामने खेळणार आहे. टी-२० मालिका झाल्यावर ५ ते ११ फ्रेब्रुवारी दरम्यान ३ एकदिवसीय मालिका होणार आहे. तर दौऱ्याच्या अखेरीस २१ फेब्रुवारी ते ४ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्यातील टी २० मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Cricket Team) जाहीर करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा २०२० मधील पहिला परदेश दौरा हा न्यूझीलंडचा आहे. त्यासाठी जाहीर केलेल्या संघात शिखर धवनचा समावेश करण्यात आला होता. पण शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी टी २० संघात खेळण्यासाठी संजू सॅमसनला बीसीसीआयनं (BCCI) नं हिरवा कंदील (Green Signal) दाखवला आहे.

टी २० संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.हेही वाचा -

आता मुंबई रात्रभर जागणार, ‘नाईटलाइफ’ला मंत्रिमंडळाची मंजुरी

मनसेच्या झेंड्याविरोधात कोर्टात जाणार, मराठा क्रांती मोर्चाचा इशारासंबंधित विषय
संबंधित बातम्या