Advertisement

आता मुंबई रात्रभर जागणार, ‘नाईटलाइफ’ला मंत्रिमंडळाची मंजुरी

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘नाईटलाइफ’ला (night life in mumba) राज्य मंत्रिमंडळाने (state cabinet) बुधवारी दुपारी मंजुरी दिली. यामुळे रात्रीच्या वेळेतही मुंबईतील अनिवासी भागातील माॅल, हाॅटेल-रेस्टाॅरंट सुरू राहतील.

आता मुंबई रात्रभर जागणार, ‘नाईटलाइफ’ला मंत्रिमंडळाची मंजुरी
SHARES

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (tourism minister aaditya thackeray) यांच्या संकल्पनेतील ‘नाईटलाइफ’ला (night life in mumba) राज्य मंत्रिमंडळाने (state cabinet) बुधवारी दुपारी मंजुरी दिली. यामुळे रात्रीच्या वेळेतही शहरातील अनिवासी भागातील माॅल, हाॅटेल-रेस्टाॅरंट सुरू राहणार आहेत. येत्या २७ जानेवारीच्या रात्रीपासून हा प्रयोग मुंबईत सुरू होणार असून आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाची माहिती दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, दिवाळी आणि गणपती (diwali and ganeshostav) सणांच्या वेळी आपण रात्रभर फिरत असतो. या निर्णयामुळे अनेक ठिकाणी तीन शिफ्टमध्ये काम चालेल. रोजगारनिर्मिती आणि महसूल वाढवण्यासोबतच लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा- ‘नाईटलाइफ’मुळे वाढतील बलात्कार, राज पुरोहित यांचा दावा

या निर्णयामुळे पब आणि बार (pub and bar) रात्रभर चालतील, असं काही नेते म्हणत आहेत. पण त्यांनी कदाचित त्यांनी जीआर वाचलेला नाही. त्यांनी आधी जाऊन जीआर वाचावा. कारण पब आणि बारसाठी महसूल खात्याचे जे नियम आहेत, ते बदलण्यात आलेले नाहीत. ते जुनेच असून पूर्वीप्रमाणे दीड वाजेची मर्यादा कायम राहणार आहे. या निर्णयाअंतर्गत केवळ दुकाने, हाॅटेल-रेस्टाॅरंट आणि माॅल (hotel restaurant and malls) २४ तास सुरू ठेवता येणार आहे. हा निर्णय देखील बंधनकारक असणार नाही, असा खुलासा आदित्य ठाकरेंनी केला.

शिवाय या निर्णयामुळे मुंबई पोलिसांवर (mumbai police) अतिरिक्त ताण पडेल, यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की, सद्यस्थितीत मुंबई पोलीस दीड वाजेपर्यंत दुकाने खुली आहेत की बंद याचा आढावा घेत फिरत असतात. त्यांना या जबाबदारीतून मुक्त करत त्यांचं तपासकार्याचं जे काम आहे, ते करायला मिळेल. त्यातही एखाद्या माॅल किंवा कंपनीला वाटलं की पोलिसांकडून खासगी सुरक्षा मिळावी, तर काही मोबदला घेऊन तशी सुरक्षाही पुरवणार आहोत, यामुळे पोलीस विभागाच्या उत्पन्नातच भर पडणार आहे. हा निर्णय गृह आणि महसूल (home &  revenue department) विभागाशी चर्चा करून, सगळे नियम अभ्यासूनच मंजूर करण्यात आला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.  

हेही वाचा- ‘नाईटलाइफ’ हा शब्दच आवडत नाही- उद्धव ठाकरे

भाजपकडून त्यांच्या ‘नाईटलाइफ’च्या संकल्पनेला जोरदार विरोध करण्यात येत आहे. त्याला ‘मन दूषित असेल, तर दृष्टीकोनही तसाच असतो,’ असं म्हणत आदित्य यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा