Advertisement

ब्रेट ली बनला कोच, मुंबईतल्या खेळाडूंना दिले क्रिकेटचे धडे!


ब्रेट ली बनला कोच, मुंबईतल्या खेळाडूंना दिले क्रिकेटचे धडे!
SHARES

क्रिकेट विश्वचषक विजेता आणि ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने मुंबईतल्या उदयोन्मुख खेळाडूंना क्रिकेटचे धडे दिले. गुरुवारी पी. जे. हिंदू जिमखाना येथे खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबीर भरवले होते.

भारतातील नवीन तरुणपिढीसांठी परदेशात संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे शिबीर घेण्यात आले होते. यावेळी जिमखान्यातील खेळाडूंनी ब्रेट ली याला अनेक प्रश्नही विचारले. या शिबिरात खेळाडूंनी गोलंदाजीचे धडे देखील गिरवले. एक वेगवान गोलंदाजाकडून प्रशिक्षण मिळत असल्याने खेळाडूंनी देखील उस्ताह दाखवला.



ब्रेट लीने खेळाडूंना कोणकोणते धडे दिले?

  • मुलांना वेगवान गोलंदाजी कशी करावी?
  • गोलंदाजी करताना कोणती काळजी घ्यावी
  • गोलंदाजीचा सराव करताना आपल्यात किती बदल होतो?

यावेळी ली म्हणाला, मी माझ्या कामात खूप व्यस्त आहे. पण आज येथे येऊन मुलांना प्रशिक्षण दिले. मुलांची शिकण्याची इच्छा बघून खरंच मी खूप प्रभावित झालो. आतापर्यंत बऱ्याच वेगवान गोलंदाजाना शिकवले. पण त्यांनी टीका केली. सचिन तेंडुलकर हा माझा जवळचा मित्र आहे. सकाळी मी त्याच्या सोबतच होतो. वेगवान गोलंदाजी ही एक कला आहे. भारतातील गोलंदाजांना मी आज सोप्या आणि प्रेमळ टीप्स दिल्या आहेत. मला भारतातील ग्रासरुट्स पर्यंत क्रिकेट खेळाडूंसाठी काम करायचे आहे.


हेही वाचा - 

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक 10 नोव्हेंबरला

ब्रेट ली म्हणतो, 'हा बघा सचिनचा खरा चाहता'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा