Advertisement

३ महिन्यांनंतर 'हा' खेळाडू भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसला

वर्ल्डकप २०१९नंतर म्हणजे तब्बल ३ महिन्यांनी ड्रेसिंगरूममध्ये हजेरी लावली.

३ महिन्यांनंतर 'हा' खेळाडू भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसला
SHARES

कसोटी अंजिक्यपद स्पर्धेतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीनं हजेरी लावली होती. वर्ल्डकप २०१९नंतर म्हणजे तब्बल ३ महिन्यांनी धोनीनं ड्रेसिंगरूममध्ये हजेरी लावली. रांचीमध्ये कसोटी सामना होत असूनही धोनी कुठं आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, धोनीला ड्रेसिंग रुममध्ये पाहताच क्रिकेटप्रेमींमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं.


चाहत्यांमध्ये चर्चा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात धोनी हजेरी लावणार होता. परंतु, मैदानात धोनी दिसत नसल्यामुळं चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली होती. मात्र, धोनी चक्क टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये दिसताच या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. बीसीसीआयनं आपल्या ट्विट हॅण्डलवर फोटो ट्विट केला. यामध्ये धोनी नवोदित फिरकीपटू शाहबाज नदीम याच्यासोबत संवाद साधताना दिसत आहे.

प्रतिक्रियांचा पाऊस

याबाबत बीसीसीआयनं ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. यावर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर धोनीने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यानंतर धोनीच्या क्रिकेट निवृत्तीबाबत अनेक चर्चा सुरू होत्या.हेही वाचा -

मतदान केंद्रांवर मोबाईल जामर नाहीच- निवडणूक आयोग

मला हरवण्यासाठी ठाकरे कुटुंबाला पैसा खर्च करावा लागला, अभिजीत बिचकुलेचा आरोपसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा