Advertisement

२०१९ वर्ल्डकप : भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण अाफ्रिकेशी


२०१९ वर्ल्डकप : भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण अाफ्रिकेशी
SHARES

एकीकडे अायपीएलचा सिझन सुरू असतानाच अाता क्रिकेटप्रेमींसाठी अानंदाची बातमी अाली अाहे. २०१९ च्या अायसीसी वर्ल्डकप स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात होणार असून भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध साऊदम्प्टन इथं ५ जून रोजी रंगणार अाहे. पुढील वर्ल्डकपच्या वेळापत्रकाविषयी अायसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक कोलकाता इथं सुरू असून स्पर्धेचं वेळापत्रक जवळपास निश्चित करण्यात अालं अाहे. हे वेळापत्रक अाता अंतिम मंजुरीसाठी अायसीसी बोर्डाकडे पाठवण्यात अालं असून महिनाभरात त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.


अायपीएलच्या तारखाही बदलणार

लोढा समितीच्या शिफारशीनुसार, अायपीएलनंतर संघातील खेळाडूंच्या विश्रांतीसाठी नंतरच्या स्पर्धेमध्ये १५ दिवसांचा कालावधी असायला हवा. इंग्लंड अाणि वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे अायोजित करण्यात येणारा वर्ल्डकप ३० मे ते १४ जुलैदरम्यान खेळवण्यात येणार अाहे. त्यामुळे अायपीएलचा समारोप १९ मे पर्यंत करावा लागणार अाहे.


भारत-पाकिस्तान लढत १९ जूनला

भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील महामुकाबला १९ जूनला रंगणार अाहे. भारताचा हा या स्पर्धेतील चौथा सामना ठरणार अाहे. १९९२ वर्ल्डकपप्रमाणे राऊंड राॅबिन पद्धतीने प्रत्येक संघ सर्व सहभागी संघांशी खेळणार अाहे. अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य सामने ९ जून (अोल्ड ट्रॅफर्ड) अाणि ११ जुलै (बर्मिंगहॅम) रोजी खेळवण्यात येतील. अंतिम सामना १४ जुलै रोजी होईल.


हेही वाचा -

U-19 वर्ल्डकप टीम इंडियाने जिंकला; अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय

म्हणून, नेहरा घेतोय क्रिकेटमधून निवृत्ती?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा