Advertisement

पृथ्वी शॉची तडाखेबाज खेळी, अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा विजय

मंगळवारी झालेल्या भारताच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताने पापुआ न्यू गिनीच्या टीमला धूळ चारत आपण वर्ल्डकपचे पक्के दावेदार असल्याचा संदेश क्रिकेट जगताला दिला. आणि भारताच्या या अंडर १९ टीमचा कॅप्टन आहे मुंबईकर पृथ्वी शॉ!

पृथ्वी शॉची तडाखेबाज खेळी, अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा विजय
SHARES

एकीकडे सीनिअर क्रिकेट टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये पराभवाचा वचपा काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे अंडर १९ ची टीम न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये एक एक पाऊल पुढे टाकतेय. मंगळवारी झालेल्या भारताच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताने पापुआ न्यू गिनीच्या टीमला धूळ चारत आपण वर्ल्डकपचे पक्के दावेदार असल्याचा संदेश क्रिकेट जगताला दिला. आणि भारताच्या या अंडर १९ टीमचा कॅप्टन आहे मुंबईकर पृथ्वी शॉ!


टीम इंडियाची दमदार आगेकूच

स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीनंतर पृथ्वी शॉची अंडर १९ टीमच्या कर्णधारपदी वर्णी लागली. पृथ्वी शॉनंही या संधीचं सोनं करत पहिल्याच मॅचपासून आपली निवड सार्थ ठरवली. वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताने विजयाचं खातं उघडलं, तर पापुआ न्यू गिनीला नमवत दमदार आगेकूच केली.


पृथ्वी शॉची तडाकेबाज हाफ सेंच्युरी

पापुआ न्यू गिनीसोबत झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये कॅप्टन पृथ्वी शॉनं केलेल्या दमदार हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारतानं सहज विजय मिळवला. त्याआधी स्पिनर अनुकुल रॉयने पापुआ न्यू गिनीचा अर्धा संघ गारद करत भारतासाठी विजय सोपा केला.


पापुआच्या बॅट्समन्सची हाराकिरी

सुरुवातीलाच नाणेफेक जिंकल्यानंतर पृथ्वी शॉनं फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला नमवून आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाचा सामना करण्यासाठी पापुआ न्यू गिनीचे सलामीवीर सिमन अटाय (१३) आणि सिनाका अरूआ (१२) यांनी आश्वासक सुरुवात केली. ओविया सॅम (१५) नेही त्यात आपले योगदान दिले. त्यानंतर मात्र, त्यांच्या एकाही बॅट्समनला प्रभावी कामगिरी करता आली नाही.


अनुकुल रॉयचा अचूक मारा

मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या अनुकुल रॉयच्या अचूक माऱ्यापुढे मान तुकवलेला पापुआ न्यू गिनीचा आख्खा संघ २१.५ ओव्हर्समध्ये अवघ्या ६४ धावांमध्ये तंबूत परतला. ६.६ ओव्हर्समध्ये १४ धावांच्या बदल्यात ५ विकेट्स घेणारा अनुकुल रॉय पापुआच्या बॅट्समन्ससाठी खरी डोकेदुखी ठरला.


पृथ्वी शॉचा तडाखा

विजयासाठी ६४ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं हे आव्हान अगदी लीलया पार केलं. अवघ्या ८ ओव्हर्समध्येच ६७ रन्स तडकावत टीम इंडियानं विजेतेपदावर नाव कोरलं. विशेष म्हणजे, यामध्ये ५७ रन्स एकट्या कॅप्टन पृथ्वी शॉचे होते.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्येही पृथ्वी शॉने ९४ रन्स करत विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. या मॅचमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला १०० रन्सने पराभूत केले होते.



हेही वाचा

मुंबईकर पृथ्वी शॉचे दुलीप ट्राॅफीत पदार्पणातच शतक, सचिनच्या रेकाॅर्डशी बरोबरी


Read this story in English or English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा