Advertisement

मुंबईकर पृथ्वी शॉच्या हाती भारताची धुरा!

पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधारपदाची धुरा मुंबईकर पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आली आहे. रविवारी ऑल इंडिया ज्युनियर संघाच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली.

मुंबईकर पृथ्वी शॉच्या हाती भारताची धुरा!
SHARES

पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधारपदाची धुरा मुंबईकर पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आली आहे. रविवारी ऑल इंडिया ज्युनियर संघाच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली.


न्यूझीलंडमध्ये भरणार विश्वचषक

सध्या रणजी क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असलेला, तसेच दुलिप ट्रॉफी स्पर्धेत पदर्पणातच शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडूचा मान मिळविलेल्या पृथ्वीला विश्वचषक स्पर्धेत मोठी संधी मिळाली आहे. ही स्पर्धा १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान न्यूझीलंडमध्ये खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघात १६ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.


बंगळुरूमध्ये सराव शिबीर

विश्वचषकाच्या पूर्वतयारीसाठी ८ ते २२ डिसेंबरदरम्यान बंगळुरू येथे सराव शिबीर ठेवण्यात आले आहे. पण सराव शिबिरादरम्यान मुंबई संघाचा रणजी सामना असणार आहे. यामध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर १२ डिसेंबरला तो बंगळुरू येथील सराव शिबिरात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. गतवर्षी भरतीय संघाला १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.


भारतीय संघ

पृथ्वी शॉ (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), मंजोत कालरा, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जुआल (यष्टीरक्षक), हार्विक देसाई (पर्यायी यष्टीरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल, अरशनदीप सिंह, अनुकुल रॉय, शिवा सिंह आणि पंकज यादव.



हेही वाचा

अवघ्या 18 व्या वर्षात पृथ्वीची तीन शतकं!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा